दिवा ;कोकण प्रतिष्ठानचा १० वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

दिवा कोकण प्रतिष्ठानची स्थापना ही २०१४ मध्ये करण्यात आली होती. कोकणी माणसानी एकत्र येऊन कोकणी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेले दिव्यातील कोकणी बांधवांचे हक्काचे व्यासपीठ होय.

ठाणे ; निलेश घाग सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेले दिवा येथील कोकण प्रतिष्ठानचा १० वा वर्धापन दिवस नुकताच सुमित हॉल दिवा येथील सभागृहात पार पडला.

याप्रसंगी हे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गोवर्धन भगत सामाजिक कार्यकर्ते , श्री.नवनीत पाटील, श्री.तुषार पाटील, खेड तालुका कोकण रहिवासी संघटना, श्री.देवेंद्र भगत, श्री.विजय भोईर, श्री.प्रकाश (बाल्या) पाटील,मराठा गडकिल्ले संवर्धक जाणता राजा मित्र मंडळ,आम्ही सिंधुदुर्ग संघटना,सेवाभावी सिंधुदुर्ग संघटना,दिव्यांग ह्यूमन राइट्स संघटना, सौ.सपना भगत, माणगाव निजामपूर संघटना,दिवा सांप्रदायिक मंडळ, महाड ता.संघ उपस्थित होते. तसेच अध्यक्ष श्री.देवदत्त घाडी,कार्यअध्यक्ष श्री.प्रशांत प्रभाकर गावडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्योलित करून झाली. यानंतर मान्यवरांचे हस्ते मार्गदर्शन दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन, लकी ड्रॉ, महिलांसाठी हळदी कुंकू, प्रतिष्ठान स्थापना दिवस २०१४ आणि १० व्या वर्धापनदिनाच्या निम्मिताने विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रतिष्ठानसाठी योगदान देणाऱ्या पदाधीकाऱ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे कोकण प्रतिष्ठानच्या महीला वर्ग तसेच पदाधिकाऱ्यांनी विविध कलागुणात्मक कार्यक्रम सादर करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

श्री.तुषार पाटील यांनी तसेच मान्यवरांनी आपल्या संभाषणात असे निदर्शनास आणून दिले की दिव्यातील बिगरराजकीय कोकण प्रतिष्ठान हे असे व्यासपीठ की जिथे प्रत्येक मराठी माणसाला उद्योजक म्हणुन प्रोत्साहन दिले जाते,बेरोजगारी ही महाराष्ट्रची नव्हे तर इतर राज्यांची समस्या आहे, त्या करीता असे व्यासपीठ असणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page