ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

Spread the love

ठाणे; निलेश घाग ठाणे रेल्वे स्थानकात नेहमीच गर्दी असते. गर्दीच्या वेळेत लोकल पकडणेही खूप अवघड होते. कधीकधी प्रवाशांना लोकलमध्ये चढायलाही मिळत नाही. ठाणे स्थानकात होणाऱ्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार, लवकरच स्टेशनच्या कामांना लवकरच मंजुरी देणार आहे. त्यांनी प्रशासनाला बैठका घेण्याचा आदेश दिला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बांगर यांची बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. 

बैठकीत अॅडिशनल कमिन्शर संदीप मालवी, प्रशांत रोडे, ट्रॅफिक डीसीपी डॉ. विनय कुमार राठोड, रेल्वे उप महाप्रबंधक संजीव जया, रेल्वे भूमि विकास प्राधिकरणच्या रमेश खोत, डीएमसी शंकर पटोले, परियोजना अधिकारी प्रवीण पापलकर, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड हे उपस्थित होते. 

स्थानकांवर कोणती कामे करण्यात येणार

– ठाणे स्थानकातील 11 प्लॅटफॉर्मवर पूर्व-पश्चिम कनेक्टिंग डेक बनवण्यात येणार आहे. 

डेक ठाणे पश्चिम आणि पूर्वकडेली सॅटिस प्रकल्पाला जोडण्यात येईल

– यामुळं गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षितही होणार आहे. 

– डेकवर वेटिंग एरिया, तिकिट ऑफीस, टॉयलेट इत्यादी सारख्या सुविधा असतील. 

– रेल्वेच्या क्षेत्रात येणाऱ्या आउटर लेटरल जागेत बहुमजली पार्किंग असणार आहे. 

– तीन-चार व्यवसायिक इमारतींचा निर्माण रेल्वे करणार आहे. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page