ठाणे महानगर पालिकेने केला ६०० कोटींचा टप्पा पार! मालमत्ता कर वसुलीतील अभय योजनेलां उत्सुर्त प्रतिसाद

Spread the love

ठाणे : निलेश घाग मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान, थक बाकीवरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने १५ जानेवारीपर्यंत ६१० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यात ११५ कोटी रुपयांच्या थक बाकीचाही समावेश आहे. १५ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या थक बाकीवरील दंड माफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, अभय योजनेच्या काळात ४८.६४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागास यश मिळाले आहे.

काही करदात्यांनी आतापर्यत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पध्दतीने मालमत्ता धारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात. त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मालमत्ता कर भरवयाचे असल्यास खालील दिलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा

www.thanecity.gov.in

करदात्यांनी अभय योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. पुढील १५ दिवस ५० टक्के दंड माफीची सवलत सुरू राहणार आहे; मात्र, त्यानंतरच्या कालावधीत कर थकीत ठेवणाऱ्या कर दात्यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल. यामध्ये मोठ्या थक बाकीदारांपासून सुरुवात करून कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल. शहर विकासात मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी वेळेत मालमत्ता कर भरण्याचे सामंजस्य नागरिकांनी दाखवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

आतापर्यंत प्रभाग समितीची दंड तसेच थकबाकी वसुली खालील प्रमाणे

उथळसर ४०.५१ ७२%

नौपाडा कोपरी ७९.११ ७६%

कळवा २ ०.०० ५६%

मुंब्रा ३६.२० ७५%

दिवा ३७.८१ ७३%

वागळे इस्टेट २३.०० ६८%

लोकमान्य सावरकर २३.९० ६३%

वर्तकनगर ९१.७० ७१%

माजिवडा मानपाडा १९३.०१ ६९%

मुख्यालय ६५.६१ ८५%

एकूण ६१०.८६ ७७%

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page