यावेळी चुक केलीत तर या देशातप्रजासत्ताक राहणार नाही : ठाकरे

Spread the love

रोहे :- आज सगळ्या जातीधर्माचे लोक सोबत येत आहेत. याचा अर्थ शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे, हे त्यांना माहीत आहे. आमचे हिंदुत्व चुल पेटवण्याचे आहे, मात्र त्यांचे हिंदुत्व घर पेटवायचे आहे. त्यांचे राजकारण चुलीत घालणार आहोत. आज त्यांना जाती धर्मात वाद पेटवायचा आहे. शासकीय यंत्रणा घरगडया सारखी ते चालवित आहेत. आज देशात हुकमशाही चालु आहे. नको ती लोक त्यांच्या सोबत आहेत. या वेळी चुक केलीत तर हा देश प्रजासत्ताक राहाणार नाही, असा इषारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जनसंवाद मेळाव्या प्रसंगी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोहयातील उरुस मैदान येथे जनसंवाद सभेत बोलत दिला आहे.
यावेळी माजी खास .अनंत गीते, आम .संजय पोतनीस, माजी आम . विनोद घोसाळकर, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, सदानंद थरवळ, जिल्हा सल्लागार किशोर जैन, विष्णु पाटील, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे, शहर प्रमुख दिपक तेंडुलकर, महादेव साळवी, विष्णु लोखंडे, इरफान दर्जी, दुर्गेश नाडकर्णी, अनिष शिंदे, यतिन धुमाळ, शैलेश फुलारे, हर्षद साळवी, राजेश काफरे, सचिन फुलारे, संतोष खेरटकर, मनोज लांजेकर, आदित्य कोंडाळकर, नितीन वारंगे आदी उपस्थित होते.
आपल्या हाणाघाती भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, आज मोदी महाराष्ट्रात येत आहेत.येथे निसर्ग चक्रीवादळ व तौक्ते चक्रीवादळ आले. ते महाराष्ट्रात आलेच नाही. मी मुख्यमंत्री होतो.अलिबाग व सिंधुदुर्गात गेलो. केंद्राकडे निधीची मागणी केली. महाराष्ट्राला एक कवडी ही दिली नाही.आज फक्त सगळे ओरबाडून नेत आहेत. आमचा हुकुमशाहीला विरोध आहे.रायगडकरांनो त्यांना टकमक टोक दाखवा ते घरणेशाहीवर बोलतात.त्यांना तटकरेंची घराणेशाही दिसत नाही का? त्यांना उमेदवारी मिळेल याची खात्री नाही.निवडुन येतील त्याची शाश्वती नाही. म्हणुन ते राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगीतले.
दरम्यान खासदार तटकरे यांच्यावर टिका करताना माजी केेंद्रीय मंत्री अनंत गिते म्हणाले, रोहा कोणाची खाजगी मालमत्ता नाही. रोह्याचा सातबारा कोणाच्या नावावर नाही. हा जनसंवाद मेळावा आहे. रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेची संवाद साधणारा हा मेळावा आहे. कालपर्यंत तुमची मक्तेदारी होती, दादागिरी होती. ती आता राहिलेली नाही हे या मेळाव्यावरून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई मराठा मुस्लिम महासंघाचे फकीर महंमद ठाकुर यांनीही विचार मांडले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page