टीम इंडियाचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी मात ….

Spread the love

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया चौथा टी ट्वेंटी तसेच कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादव याची ही पहिलीच मालिका होती. सूर्याने टीम इंडियाला आपल्या कॅप्टन्सीत भारताला मालिका जिंकून दिलीय. टीम इंडियाचा हा घरातील सलग पाचवा टी 20 मालिका विजय ठरला आहे.

रायपूर- टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्या टी 20 सामन्यात 20 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर 7 विकेट्स गमावून कांगारुंना 154 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे.टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा रविवारी 3 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाकडून ओपनर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 31 धावांचं योगदान दिलं. मॅथ्यू शॉर्ट 22 रन्स करुन माघारी परतला. टीम डेव्हिड आणि बेन मॅकडरमॉट या दोघांनी प्रत्येकी 19 धावांचं योगदान दिलं. जोश फिलीपी आणि एरोन हार्डी या दोघांनी प्रत्येकी 8 धावा केल्या. बेन द्वारशुइस 1 रन करुन माघारी परतला. तर कॅप्टन मॅथ्यु वेड याने अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र त्याला कांगारुंना विजय मिळवून देता आलं नाही. मॅथ्युने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर ख्रिस ग्रीन 2 धावांवर नाबाद राहिला.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल बॉलिंग केली. गोलंदाजांना 175 धावांचं आव्हान राखता आलं. टीम इंडियाकडून अक्षर पटेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीपक चाहर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर आवेश खान आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

टीम इंडियाचा घरातील सलग पाचवा मालिका विजय

टीम इंडियाची बॅटिंग
दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीने आश्वासक सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी अर्धशतकी सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर ही जोडी फुटली. यशस्वी 37 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर उपकर्णधार श्रेयस अय्यर झटपट आऊट झाला. श्रेयसने 8 धावा जोडल्या. श्रेयसनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवही फक्त 1 रन करुन आऊट मैदानाबाहेर गेला.

सूर्या आऊट झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्मा या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र ही जोडी फुटली ऋतुराज गायकवाड 32 धावांवर बाद झाला. सूर्यानंतर जितेशही 35 रन्स करुन तंबूत परतला. अवघ्या काही धावंच्या मोबदल्यात टीम इंडियाने 4 विकेट्स गमावल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइस याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर आरोन हार्डी याने 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन-

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन-

मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page