
अंबरनाथ / प्रतिनिधी अंबरनाथ (प) कैलासनगर या ठिकाणी राहत असलेले शंकर शेलवराज हे कोरोना काळात मयत झाले असून त्यांच्या नावे असणारी घर क्रमांक १०१२ ‘अ’ ही मिळकत शंकर शेलवराज यांनी मरण्यापूर्वी २०१५ ला खरेदीखाताने विकत घेतली व सदर ठिकाणी घर व गाळ्यात राहू लागला. त्यानंतर शंकर शेलवराज याचे कोरोना काळात दि. २९ डिसेंबर २०२० रोजी मयत झाले. तेव्हा सदरील मिळकत तंगराज वील्लादुराई नाडार यांच्यानावे करण्यात आली. मात्र काही लोकांनी व नगरपालिकेने तंगराज वील्लादुराई नाडार यांची दिशाभूल करत शंकर शेलवराज याची मयत झाल्यानंतर हे घर कसे काय खरेदी केले हे समजून येत नाही. तरीही घरपट्टी विभागाचे अधिकारी यांनी बेकायदेशीर कागदपत्र बनविणाऱ्या व्यक्तीलाच मदत करतात अशा आरोप तंगराज वील्लादुराई नाडार यांनी केला आहे. तसेच माझ्या भावाचे घर मी म्हणजेच तंगराज वील्लादुराई नाडार यांनी २०१५ ला खरेदी केली असताना अंबरनाथ नगरपरिषद घरपट्टी विभागाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करून इतरांनी तयार केलेल्या बोगस कागदपत्रांची व भावाला दिलेल्या बोगस चेकची चौकशी बँकेत जाऊन करावी अशी मागणी करण्यात आली. तेव्हा अंबरनाथ नगरपरिषद काही दलाल मंडळीला हाताशी धरून बोगस कागदपत्रे तयार करून कामे करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तरी अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रशासकांनी याबाबत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत आता त्यांनी थेट न्यायालयातच अंबरनाथ नगरपरिषदेच्या अन्याय विरोधात दाद मागितली असून, अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी, हुसेन मोहम्मद इस्माईल मेमन व यास्मीन मोहम्मद इस्माईल मेमन या लोकांवर दावा दाखल केला असल्याचे आरोप तंगराज वील्लादुराई नाडार यांनी केला आहे.
जाहिरात




