कोकण रेल्वेत चोरी करणाऱ्या संशयितास गोव्यातून घेतले ताब्यात

Spread the love

चिपळूण :- मडगाव – नागपूर या रेल्वेमध्ये प्रवाशाची पर्स लंपास करून पसार झालेल्या चोरट्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा येथून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सादिक एजाज अहमद कमानघर ( २६ ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याला चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . दि . ८ ते ९ ऑक्टोबर दरम्यान एक कुटुंब वडोदरा , गुजरात येथे जाण्याकरिता गोवा येथून मडगाव एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास करीत होते . हा प्रवास लांबचा असल्याने प्रवासादरम्यान हे कुटुंब आपले सर्व किमती सामान आपल्या डोक्याजवळ घेऊन झोपून प्रवास करत होते . चिपळूण रेल्वे स्टेशन येथे रेल्वे थांबल्यावर या कुटुंबाला जाग आली आणि आपल्या साहित्य – सामानाची खात्री केली असता त्यांना त्यांची शोल्डर पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले . या पर्स मध्ये त्यांचे दोन मोबाईल व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती . याबाबत चिपळूण पोलिस ठाणे येथे फिर्याद देण्यात आली . त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला . या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्यामार्फत समांतर तपास देखील सुरू करण्यात आला होता .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page