
▪️ आयसीसीच्या क्रमवारीत सध्या हिंदुस्थानी खेळाडूंचा बोलबाला आहे. आयसीसीने बुधवारी टी-२० क्रिकेटमधील क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा केली. या महत्त्वाचा सन्मान टिम इंडियाच्या सूर्यकुमार यादवने जिंकला आहे. गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या धमाकेदार खेळीने सूर्यकुमारने चाहत्यांची मने जिंकली होती. आता त्याला ‘क्रिकेटर ऑफ ईयर’ हा महत्त्वाचा सन्मान मिळाला आहे.
▪️ क्रिकेटर ऑफ इयर सन्मान मिळवत सूर्यकुमारने इंग्लंडच्या सॅम करन, झिम्ब्बाबेच्या सिंकदर रझा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. २०२२ या वर्षात सूर्यकुमारने ३१ सामन्यात ११६४ धावा केल्या होत्या. त्याने १८७.४३ स्ट्राईक रेटने या धावा केल्या होत्या, हा स्ट्राईक रेट इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच एका वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये १००० पेक्षा जास्त धावा करणारा सूर्यकुमार हा पहिला खेळाडू ठरला आहे.