सांसद आदर्श ग्रामपंचायत गोळवली व आरोग्यवर्धिनी केंद्र धामणी यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्य नमस्काराचे आयोजन! …

Spread the love

श्रीकृष्ण खातू /धामणी – दि. ४फेब्रुवारी हा संपूर्ण जगामध्ये जागतिक सूर्य नमस्कार  दिन साजरा केला जातो. सूर्यनमस्कार रोजच केल्याने मानवी शरीर खूप तंदुरुस्त राहते,रक्ताभिसरण, तसेच पचन क्रिया सुधारते व भूक चांगली राहते. अशा प्रकारचे महत्व बाल  वयापासूनच समजावे , व नियमित सूर्य नमस्काराची   सवय लागावी,अशा उदात्त हेतूने या निमित्त धामणी व गोळवली गावांमधील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लहान गट – इयत्ता पहिली ते तिसरी व मोठा गट इयत्ता चौथी ते सातवी अशी  सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लहान गट मध्ये प्रथम क्रमांक- शिवम अमोल मेस्त्री, द्वितीय क्रमांक – कैवल्य निनाद प्रसादे, तृतीय क्रमांक – अर्णव मनोहर किंजळकर व मोठा गट मध्ये प्रथम क्रमांक- श्रावणी जगन गुरव, द्वितीय क्रमांक – मुक्ता देवेंद्र शिंदे, तृतीय क्रमांक – हेमल उल्हास लिंगायत या विद्यार्थ्यांनी पटकाविला.

या स्पर्धेचे परीक्षण (योगा प्रशिक्षक) व समुदाय आरोग्य अधिकारी अश्विनी  मेणे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
तसेच सहभागी स्पर्धकांना सुध्दा सहभाग प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाची सुरुवात गोळवली गावच्या सरपंच  शालिनी पतये  यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाला गोळवली ग्रामपंचायत ग्रामसेवक .सुनिल जाधव , पोलीस पाटील  अनंत (अप्पा) पाध्ये,ग्रामपंचायत सदस्य मनोहर किंजळकर, सदस्या  संजना जाधव, धामणी सरपंच संतोष काणेकर, जन आरोग्य समिती सदस्य सरिता पाष्टे, व सुजाता भाटकर  आरोग्यवर्धिनी केंद्र धामणीच्या समुदाय आरोग्य अधिकारी (योगा प्रशिक्षक) अश्विनी  मेणे ,आरोग्य सेविका  सारिका साळवी, आरोग्य सेवक राजेंद्र घाणेकर,आशा सेविका  भारती मेस्त्री, आशा सेविका  मानसी कांबळे व मदतनीस रंजना कोळवणकर ,   ग्रा.पं.कर्मरचारी जगदिश गमरे ,धामणी व गोळवली गावांमधील सर्व शिक्षक कर्मचारीवर्ग व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन  नंदकिशोर मोहिरे यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page