
प्रतिनिधी : विनोद चव्हाण चर्चगेट मोटरमन गार्ड, श्री शिवजयंती उत्सव, पच्छिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समिती, पश्चिम रेल्वे भारतीय कामगार सेना आणि श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी उत्सव चर्चगेट येथे संपन्न ! या सोहळ्यात पश्चिम विभागा मधील सेहेचाळीस वारकरी दिंड्यांनी सहभाग घेतला होता, तसेच दहाहजार पेक्षा जास्त वारकरी या रिंगण सोहोळ्यात प्रत्यक्षात सहभागी झाले होते.

‘चला हो पंढरीला जाऊ, जीवाच्या जिवलगा पाहू” या अभंगाच्या जय घोषात सकाळी विरार वरून सुरु झालेली दिंडी चर्चगेट येथे पोहोचली. प्रथम रेल्वे कर्मचारी आणि श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या च्या पदाधिकारी यांनी विठ्ठलाच्या मूर्तीची विधी प्रमाणे पूजा करून तुळशी हार मूर्तीला अर्पण करून आरती अंतर पंचपदी करून दिंडी सोहळ्यास सुरवात केली. एक एक म्हणता पश्चिम विभागातील तब्बल सेहेचाळीस भजन मंडळाच्या दिंड्या या ठिकाणी आल्या. दिंडीचे खास आकर्षण ठरले ते स्व. ढोके मामा रेल्वे प्रवासी सांस्कृतिक आणि सामजिक संस्थेचे भजन मंडळ. लहान मुलानी केलेली संताची वेशभूषा आणि सर्व मंडळी यांनी परिधान केलेलं लाल फेटा, वारकरी पोशाख. एकशे बावन भजन मंडळाच्या महासंघाचा आणि रेल्वे प्रवासी एकत्र येऊन रिंगण सोहळा चर्चगेट येथे संपन्न झाला. या मध्ये अधिकारी वर्ग, कर्मचारी, रेल्वे पोलीस, महिला प्रवासी, आणि सर्व वारकरी मांडळी ज्ञनोबा माऊली तुकाराम यांच्या गजरावर ठेकाधरून नाचताना पाहायला येथे मिळाले.

रेल्वे प्रशासन आणि श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था यांच्या उत्तम नियोजनाने हा कार्यक्रम साजरा झाला. महा प्रसाद म्हणून सर्वाना साबुदाणा खीचडी, पाणी आणि केळीचे वाटप करण्यात आले. प्रत्येक दिंडीचे स्वागत करताना शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वगत करण्यात आले. या रिंगण सोहळ्यात प्रमुख उपस्थिती वरिष्ठ परिचालन प्रबंधक-मुंबई विभाग- श्री पियुश खंदारे, वरिष्ठ परिचालन प्रबंधक -मुंबई- श्री अभय सानप, सहाय्यक परिचालन प्रबंधक-मुंबई – श्री राजवीर, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन चे सरचिटणीस – श्री प्रशांत कानडे, जिआरपी -चर्चगेट – वरिष्ठ पोलीस निरीक्षक – श्री थोरात, आर पी एफ चर्चगेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक – श्री प्रवीण कुमार, चर्चगेट स्टेशन मॅनेजर- श्री दिलीप पवार, निनादा साहेब, श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे संस्थापक शिवाजी पाटील, अध्यक्ष वसंत प्रभू , मुख्य कार्यकारी अधिकारी जयराम पवार, जनार्दन धयाळ कर आणि संपूर्ण कार्यकारिणी, सलग्न भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. असा सुख सोहळा स्वर्गी नाही.