राजापूर अर्बन बॅंकेची यशस्वी वाटचाल , ३ कोटी २२ लाखाचा निव्वळ नफा….

Spread the love

राजापूर /  प्रतिनिधी – राजापूर अर्बन बँकेच्या  एकूण ठेवी या रु.४७३ कोटी ५०लाख, कर्ज व्यवहार रु.२९८ कोटी २० लाख, अहवाल वर्षात बँकेला निव्वळ नफा रु३ कोटी २२ लाख ६२ हजार झाला असून यावर्षी १० टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ अनामिका जाधव आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली
     
गेली अनेक वर्षे वैधानिक लेखापरिक्षणात कायम ‘अ’ वर्ग राखलेला असून याही वर्षी ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. बँकेचे ढोबळ एन.पी.ए.प्रमाण १. २३ टक्के इतके राखण्यात यश संपादन केलेले आहे. सातत्याने गेली १४ वर्षे नक्त एन.पी.ए.प्रमाण ० टक्के राखण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळेच आपल्या बँकेच्या सन २०२३-२४ च्या वार्षिक प्रगतीचा आलेख हा पुन्हा उच्चस्थानी कायम ठेवण्यात बँकेने निश्चितच यश मिळविले आहे. या बरोबरच बँक रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार एफएसडब्लूएमचे सर्व निकष पूर्ण केले असल्याची माहीती आयोजीत पत्रकार परिषदेत देण्यात आली.
    
बँकेच्या 103 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने बँकेच्या सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजती केली होती.  यावेळी बँकेच्या चेअरमन सौ अनामिका जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे, व्हाईस चेअरमन विवेक गादीकर, संचालक जयंत अभ्यंकर, संजय ओगले, प्रकाश कातकर, दिनानाथ कोळवणकर,प्रसाद मोहरकर, सौ.पतिभा रेडीज,, लेखपार रमेश काळेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.. बँकेच्या सर्व शाखा या स्वमालकीच्या जागेत व्हाव्यात अशी सभासदांची कायम आग्रही मागणी होत आहे. त्या नुसार बँकेने या पूर्वी प्रधान कार्यालयासह राजापूर, रत्नागिरी, मालवण या शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यान्वीत केलेल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात लांजा शाखा देखील स्वमालकीच्या जागेत कार्यान्वीत करण्याचा मानस संचालक मंडळाचा असून त्या दृष्टीने लांजा बाजारपेठेतील मोक्याच्या ठिकाणी जागा खरेदी करण्याबाबत साठेखत बँकेने केलेले असून पुढील 2-3 महिन्यांमध्ये लांजा शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यान्वीत होणार आहे.

त्याच प्रमाणे बँकेच्या जुन्या सा. नाटे व पाचल शाखांसाठी मोक्याच्या जागा उपलब्ध होणेसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असून जागेसाठी पाहणी झाली आहे. मात्र सदर जागांमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे जागा खरेदी व्यवहार अद्याप प्रलंबीत राहिले असून त्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत, त्यांचे निराकरण झाल्यास या ही शाखा भविष्यात स्वमालकीच्या जागेत कार्यान्वीत करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे सांगितले.आयोजीत पत्रकार परीषदेत आजवरची बँकेची सुरु असलेली घोडदौड त्याचा परामर्श घेण्यात आला. पुढील काळातील बँकेचे उद्दिष्टे  याची माहिती देण्यात आली.
 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page