मंडणगड (प्रतिनिधी): येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्भावना दिना’निमित्त सर्व जाती-धर्मांमध्ये सद्भावना राखण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर होते.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी ‘भारताला विकसित देश बनवण्याचे स्वप्न पाहणा-या देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘सद्भावना दिवस’ 20 ऑगस्ट ला साजरा केला जातो. सर्व धर्मातील भारतीय लोकंमध्ये राष्ट्रीय एकात्मता, शांतता, स्नेह आणि सांप्रदायिक सद्भावना यांना प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाचे अन्न्यसाधारण महत्व आहे. या सर्वांमध्ये एकता साधण्यासाठी सर्व जाती-धर्मांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होणे गरजेचे असून यासाठी विध्यार्थ्यानी स्वतः सद्भावनेचे पालन करून समाजात यासंबंधी जनजागृती करावी’ असे सांगितले.
यावेळी कु. ऋणाली सागवेकर हिने सर्व विध्यार्थ्याना विविध जाती-धर्मांमध्ये सद्भावना राखण्याची शपथ दिली.
कार्यक्रमास सर्व स्वयंसेवक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.विष्णू जायभाये यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.