मुंडे महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या विध्यार्थ्यानी ‘गुगल अर्थ ऑण्ड मॅपिंग’ या कार्यशाळेत घेतला सहभाग…

Spread the love

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व डीबीजे महाविद्यालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने डीबीजे महाविद्यालय चिपळूण येथे ‘गुगल अर्थ अॅण्ड मॅपिंग’ या विषयाची एक दिवशीय कार्यशाळा तृतीय वर्ष भूगोल विषयाच्या विद्याथ्र्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत महिला महाविद्यालय, दापोली, आनंदराव पवार महाविद्यालय चिपळूण, छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय टेटवली आदी महाविद्यालयांतील 30 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेचे उद्घाटन डीबीजे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. हनुमंत सुतार, डॉ. राहूल पवार, डॉ. राजू झोरे यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेमध्ये हनुमंत सुतार यांनी भौगोलिक माहिती प्रणालीचे महत्त्व व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर’ याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. राजू झोरे व डॉ. राहूल पवार यांनी गुगल अर्थच्या सहाय्याने नकाशा बनविणे, नकाशातील अंतर मोजणे, रस्ता-रेल्वेमार्ग दाखविणे आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर डीबीजे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राणीसंग्रहालयास सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेट दिली. यावेळी डॉ. सुहास वाघमोडे यांनी विद्याथ्र्यांना प्राणीसंग्रहालयातील प्रत्येक प्राण्याचा अधिवास, त्यांची गुणवैशिष्ठये सांगून या प्राणीसंग्रहालयात असणा-या विविध प्राणी सर्प, ससा, हरिण, बिबटया, तरस, घुबड, काळवीट, रानकोंबडा आदी प्राणी व पक्ष्यांची सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस बापट, रजिस्ट्रार श्री. अनिल कलकुटकी, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. बामणे, संगणक विभागाचे प्रमुख प्रा. नलावडे, प्रा. प्रतिक्षा मोहिते, प्रा. राधिका वरपे, प्रा. मिनाज श्रीवर्धनकर, प्रा. जुइली पवार आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page