रत्नागिरी- माणसाच्या आयुष्याला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम शाळेमध्ये केले जाते. शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही तर मूल्यशिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व कलाशिक्षण यासारख्या विषयाच्या माध्यमातून परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याचे काम शाळेमध्ये केले जाते.
आई-वडिलांच्या संस्काराबरोबरच परिपूर्ण होण्यासाठी शाळेचे संस्कार खूप महत्त्वाचे असतात असे मत रत्नागिरी जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करते यांनी व्यक्त केले ते येथील कै.बा.रा. नागवेकर तथा हातिसकर मास्तर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ-उतार हे ठरलेले असतात.सध्या बाहेर अनेक आकर्षण आहेत. या सर्व आकर्षणांपासून स्वतःला दूर ठेवून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. आपल्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करा व गाडी चालवण्याचा परवाना मिळाल्याशिवाय कोणीही गाडी चालू नका तसेच मोठे होण्यासाठी संकुचित राहू नका मेल त्या संधीचे सोने करा व सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्नशील राहा असे मत करपे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेंभ्ये पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.प्रशांत पवार, सचिव श्रीम.आशाताई साळवी, खजिनदार रामचंद्र शिंदे,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुशांत पाटील,संस्था सभासद सौरभ पवार, प्रशालेचे मुख्याध्यापक मंगेश जाधव,ज्येष्ठ अध्यापक चंद्रकांत माने, संस्था सदस्य व अध्यापक योगेश साळवी, उदय साळवी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व संस्थेचे कार्याध्यक्ष काही अनंतराव साळवी तसेच पंचक्रोशीतील दुःखद निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन,सरस्वती पूजन व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथींचे स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक मंगेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संस्था सचिव श्रीम. आशाताई साळवी यांनी आपल्या मनोगतातून शाळेची उभारणी कशी झाली हे स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये ॲड.प्रशांत पवार यांनी ग्रंथालयात मिळणारे ज्ञानच प्रथम दर्जाचे ज्ञान मानले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांवरच अवलंबून राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले
*प्रशालेचे आदर्श विद्यार्थी म्हणून यावर्षी इयत्ता दहावीच्या वर्गातून कुमारी स्वरूपा आठवले व कुमार वेदांत नागवेकर तर इयत्ता बारावीच्या वर्गातून कुमारी शिवानी सागवेकर व कुमार वेदांत शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.*
*उपस्थित मान्यवरांचे आभार प्रशालेचे जेष्ठ अध्यापक चंद्रकांत माने यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक सागर पाटील यांनी केले.*