मोफत वीज योजनेवर उड्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला तुफान प्रतिसाद…

Spread the love

PM Surya Ghar Yojana | पीएम सूर्य घर योजनेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला असम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू , उत्तर प्रदेश आणि देशातील इतर राज्यातून भरभरुन प्रतिसाद मिळाला, काय आहे ही योजना?
मोफत वीज योजनेवर उड्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला तुफान प्रतिसाद

नवी दिल्ली | 16 March 2024 : छतावर सोलर पॅनल लावून वीज निर्मितीच्या पीएम सूर्योदय योजनेला (PM Suryoday Yojana) मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेत 300 युनिट वीज मोफत मिळते. तर वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होईल. यावर्षीच्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दुस्तूरखुद्द पंतप्रधानांनीच याविषयीची आकडेवारी सार्वजनिक केली. आकडेवारीवर नजर टाकल्यास अक्षय ऊर्जा निर्मितीत भारत जगात नवीन रेकॉर्ड केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे.

🔹️इतक्या कोटी लोकांची नोंदणी..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजनेला भारतीयांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. ही योजना सुरु होण्याच्या एकाच महिन्यात 1 कोटी कुटुंबांनी या योजनेत नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. हा रेकॉर्डब्रेक आकडा आहे. देशात एक कोटी घरांना सौरऊर्जेचे कवच देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी केले होते. हे लक्ष एकाच महिन्यात पूर्ण झाले आहे. भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया X वर ही आनंदवार्ता शेअर केली. पीएम सूर्य घर योजनेसाठी नोंदणी सुरु झाली. त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाला. असम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळानाडू आणि उत्तर प्रदेशात 5 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

🔹️अशी आहे योजना..

▪️PM Surya Ghar Yojana ग्राहकांना सबसिडी मिळणार ग्राहकांना या योजनेतंर्गत 300 युनिट वीज मोफत मिळणार..

▪️अधिक वीज उत्पादन झाले तर त्यातून 18000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल…

▪️या योजनेसाठी केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे…

▪️बँकेत या योजनेसाठी कर्ज मागितल्यास त्यावर ग्राहकांना सवलत पण मिळणार…

▪️या योजनेसाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येईल…

▪️अर्ज करण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल…

▪️Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल

🔹️कोणाला करता येईल अर्ज….

▪️कोणताही भारतीय नागरीक, संस्था
स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी

▪️हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी

🔹️अर्जदाराकडे वीज जोडणी असावी असा करा अर्ज…

▪️https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration वर जा..

▪️या ठिकाणी नाव, पत्ता आणि इतर संपूर्ण तपशील भरा…

▪️या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल…

▪️भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लावतील…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page