इकडे शेअर विका; लगेच खात्यात पैसा, T+0 सेटलमेंटला मंजूरी…

Spread the love

Share T+0 Settlement | आतापर्यंत शेअर बाजारात T+1 सेटलमेंट सायकल लागू आहे. म्हणजे शेअर खरेदी-विक्रीच्या सेटलमेंटसाठी एक दिवस लागतो. त्यापूर्वी तीन ते चार दिवस लागत होते. हा कालावधी गेल्यावर्षी कमी झाला. तर आता शेअरची खरेदी-विक्रीची सेटलमेंट लागलीच होईल.

इकडे शेअर विका; लगेच खात्यात पैसा, T+0 सेटलमेंटला मंजूरी..

नवी दिल्ली | 17 March 2024 : शेअर बाजारात स्टॉक खरेदी-विक्रीची सेटलमेंट लागलीच होणार आहे. सध्या T+1 सेटलमेंट सायकल लागू आहे. म्हणजे शेअर खरेदी-विक्री सेटलमेंटसाठी एक दिवस लागतो. तो आता इतिहासजमा होईल. T+0 सेटलमेंटला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मंजूरी दिली आहे. शुक्रवारी सेबी बोर्डाने हा निर्णय घेतला. त्यामुळे शेअर विकला की लागलीच तुमच्या खात्यात रक्कम (T+0 Settlement) जमा होणार आहे. या महिन्यातच हा निर्णय लागू होत आहे. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होईल.

चीनच्या बरोबरीने भारत…

सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, शेअरच्या खरेदी-विक्रीचा झटपट व्यवहार होईल. ही व्यवस्था मार्च 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या देशात भारतीय शेअर बाजारात T+1 व्यवस्था लागू आहे. जगातील अनेक देशात सध्या T+2 अशी व्यवस्था आहे. T+0 ही व्यवस्था लागू झाल्यामुळे भारत हा चीननंतर अशी व्यवस्था देणारा जगातील दुसरा देश ठरला आहे. या 28 मार्चपासून कॅश सेगमेंटमध्ये खात्यात झटपट पैसा जमा होईल.

एआयची मदत…

सेबीचे म्युच्युअल फंडावर बारकाईने नजर ठेवत आहे. त्यासाठी जवळपास 80 एल्गोरिदमचा वापर करण्यात येत आहे. फंड हाऊसने गडबडी केल्यास त्यासंबंधीचा अहवाल लागलीच तयार करण्यात येत आहे. आता AI ची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असेल तर ते समोर येणार आहे.

असा होईल बदल…

मार्केट नियंत्रक सेबीने याविषयीची माहिती यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार, T+0 लागू केल्यास सेटलमेंट करताना लिक्विडीटीची अडचण येणार नाही. गुंतवणूकदाराकडे T+1 ऐवजी T+0 आणि झटपट सेटलमेंटचा पर्याय असेल. T+0 दुपारी 1:30 वाजेपर्यंत व्यापारासाठी मदत करेल. यामध्ये शेअरचा पैसा संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.

दुसऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांना 3:30 वाजेपर्यंतच्या सर्व व्यवहारासाठी पर्यायी झटपट सेटलमेंटचा पर्याय मिळेल. ट्रेडर्स, गुंतवणूकदार अशा पर्यायाद्वारे सहज ट्रेडिंग करतील. त्यामुळे खात्यात रक्कम जमा होण्यासाठी त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page