राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते धामणसेत १ मार्च रोजी पूल, रस्त्याचे होणार भूमीपूजन…

Spread the love

रत्नागिरी/29 फेब्रुवारी- तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पूल व रस्त्याचे भूमीपूजन उद्या शुक्रवारी दि. १ मार्च रोजी होणार आहे.

श्री. चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी १०. ३० वाजता धामणसे हटवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. हटवाडी, चौकेवाडी, बौद्धवाडी, खरवते गावाला जोडणारा रस्ता व पूल या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपा नेते आमदार रवींद्र चव्हाण यांनी तब्बल तीन कोटी रूपये मंजूर केले. यामुळे या वाड्यांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून पावसाळ्यातील गैरसोय दूर होणार आहे. विद्यार्थी, ग्रामस्थ, महिलांना याचा फायदा होणार आहे.

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माजी नगरसेवक, धामणसे गावचे सुपुत्र उमेश कुळकर्णी, सरपंच अमर रहाटे, उपसरपंच अनंत जाधव यांनी पुलासाठी निधीची मागणी केली होती. त्याला तत्काळ मंजुरी मिळाली. श्री. चव्हाण धामणसें दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याकरिता भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुख विश्वास धनावडे, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी धनावडे, अनघा जाधव, ऋतुजा कुळकर्णी व रेश्मा डाफळे, तसेच विनायक भुवड, अविनाश लोगडे, राजू डाफळे, विलास धनावडे, मुकुंद जोशी अनंत गोताड, विनायक भुवड, सुरेंद्र रहाटे, दत्ताराम रेवाळे, विजय सांबरे व भाजपाचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी झेंडे, बॅनर लावण्यासाठी मेहनत घेत आहेत.

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख व माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उमेश कुळकर्णी, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमरकर, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना चवंडे व जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page