आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घेतली शपथ..

Spread the love

जिवित हानी टाळण्यासाठी सजगतेने सामोरे जाणे आवश्यक…

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी..

रत्नागिरी, दि.13 : आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो. त्याच्याकडे पाहिले पाहिजे. शिवाय त्याबाबत अंमलबजावणीही करायला हवी. सजगतेने, एकदिलाने, एकमेकांचे हात धरुन येणाऱ्या आपत्तीला सामोरे गेल्यास जिवित हानी टाळू शकतो, असे मार्गदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी कर्मचारी यांनी शपथ घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी ही शपथ दिली.

मी प्रतिज्ञा करतो की, शासनाच्या आपत्ती सौम्यीकरण्याच्या विविध उपक्रमात मी सक्रिय सहभाग नोंदवून, आपत्ती पासून माझी, माझ्या परिवाराची, माझ्या समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन. आपत्ती धोके कमी करणाऱ्या समुदाय आधारित उपक्रमामध्ये मी सक्रिय सहभाग घेईन. माझ्या परिवारात व समाजात आपत्तीबद्दल जनजागृत्ती करुन त्यासंबंधी पूर्वतयारी कशी करावी, या विषयी सदैव प्रयत्न करीन. राज्यातील आपत्ती प्रवण भागात जिवित, वित्त व पर्यावरण विषयक हानी हाऊ नये, म्हणून मी सदैव कटिबध्द राहीन.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी आपत्ती म्हणजे काय, याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, येणाऱ्या आपत्ती विषयी नेहमीच सजग रहायला हवे. विविध आपत्तींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन वाढविले पाहिजे. यातून आपलले अनुभव समृद्ध होतील. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत खात्री करावी. त्यावर येणारी माहिती खोटी असेल, तर ते विसरायला हवे. खरी असेल, तर त्यावर मात कसे करता येईल, याचा विचार करायला हवा.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघाने आजचा दिवस जाहीर केला आहे. डब्लूएचओने मानवी प्रजातीला असणाऱ्या 10 धोक्यांची यादी बनविली आहे. यात प्रथम क्रमांकावर पर्यावरण बदलाचा मुद्दा आहे. आपत्ती व्यवस्थापनात मन लावून काम करणे हे अपेक्षित आहे.

जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनीही अनुभव कथन करुन मॉक ड्रिल घेण्याबाबत सूचना केली. यावेळी सर्वसाधारण शाखेच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकार अजय सूर्यवंशी आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page