
रत्नागिरी- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे पार पडली.
सदर स्पर्धेकरीता जिल्हाभरातून सुमारे ७०० खेळाडूनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये एस. आर. के. तायक्वांदो क्लबचे ६५ खेळाडू विविध गटात सहभागी झाले होते.
या स्पर्धेत शोण आंब्रे, तीर्था लिंगायत, गार्गी घडशी, रुद्र शिंदे, आराध्य सावंत (२ सुवर्ण पदके), आर्वी नार्वेकर, गुरमीत चव्हाण, रोहित कुंडकर, स्वरा साखळकर (२ सुवर्ण पदके) मृण्मयी वायंगणकर (२ सुवर्ण पदके) स्वर्णिका रसाळ, सार्थक चव्हाण,अमेय सावंत, वेदांत चव्हाण, सई सावंत, श्रुती चव्हाण या खेळाडूंनी सुवर्ण पदकांची कमाई केली. क्लबची खेळाडू स्वरा साखळकर हिने वैयक्तिक पूमसे कॅडेट या प्रकारात सुवर्णपदक मिळवले.
रौप्य पदक मानकरी यश पारकर, तुळजा, हर्ष, श्रीनिधी पाटील, वेदिका पवार, आयरा गावखडकर, मिद्द्दहत नाईक, यज्ञा चव्हाण, केतकी चिगरे (२ रौप्य पदके) श्रेयसी हतिसकर, सुजल सोळंके हे खेळाडू ठरले.
स्पर्धेत प्रांजल लांजेकर, यज्ञा चव्हाण, ओम अपराज, पार्थ गुरव, निधी राऊत, शौनक भोपळे, अद्वैत पाटील, ओम रेवाळे, यश भागवत,मानस शिगवण यांना रौप्य पदक प्राप्त झाले.
स्पर्धेत यशस्वी झालेल्या या खेळाडूंच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर आणि समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेसाठी क्लबच्या सई सावंत, सुजल साळुंखे, साहिल आंबेरकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. संघ प्रशिक्षक खेळाडूंना म्हणून शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभले.