
त्रिनिदाद- दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेने 7 वेळा अपयशी ठरल्यानंतर अखेर आठव्या प्रयत्नात वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये 27 जून रोजी अफगाणिस्तानवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 57 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 8.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. अफगाणिस्तानचं या पराभवासह आव्हान संपुष्टात आलं आहे. आता दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत टीम इंडिया-इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध भिडणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. यंदाच्या विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. यासह अफगाणिस्तान संघाचे प्रथमच विश्वचषक फायनल खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ९ विकेट्सने जिंकला, अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना ५६ धावा करून सर्वबाद झाला. तर दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकांत 57 धावांचे लक्ष्य गाठले.
दक्षिण आफ्रिकेसाठी रीझा हेंड्रिक्स २९ धावा करून नाबाद परतला आणि कर्णधार एडन मारक्रम २३ धावा करून नाबाद परतला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने एकमेव विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक याने 5 धावा केल्या. तर रिझा हेंडीक्स आणि कॅप्टन एडन मारक्रम या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं. क्विंटन डी कॉक 5 धावांवर आऊट झाला. त्यानंतर रिझा आणि एडन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी याने एकमेव विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी अफगाणिस्तान कॅप्टन राशिद खान याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तान सपेशल अपयशी ठरली. अफगाणिस्तानला धड 12 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 56 धावांवर गुंडाळलं. अफगाणिस्तानसाठी एकट्या अझमतुल्लाह याने दुहेरी आकडा गाठला. अझमतुल्लाहने सर्वाधिक 10 धावा केल्या. तिघांना खातंही उघडता आलं नाही. तर एकटा 2 धावांवर नाबाद राहिला. तर उर्वरित फलंदाजांपैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जान्सेन आणि तबरेझ शम्सी या दोघांनी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर कगिसो रबाडा आण एनरिच नॉर्खिया या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या.