…म्हणून इस्रायल इराणमधील अणु प्रकल्पाला करत होता लक्ष्य! अमेरिकन अधिकाऱ्याने व्यक्त केली शंका

Spread the love

इराणमधील शस्त्रास्त्र कारखान्यावर मोठा ड्रोन हल्ला झाल्याची बातमी जगभर पसरली आहे. इराणमधील इस्फहान शहरात असलेल्या एका कारखान्यावर हा हल्ला झाला. आता या हल्ल्यात इस्रायलचा हात असल्याच्या बातम्या येत आहेत. इस्त्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्याचवेळी वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन संरक्षण सूत्रांचा हवाला देत इराणमधील हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे म्हटले आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट्रिक रायझर यांनी दावा केला आहे की, इराणवरील हल्ल्यात अमेरिकन सैन्याचा हात नव्हता.

इराणने अधिकृतपणे कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही आणि शस्त्रास्त्र कारखान्यावरील ड्रोन हल्ल्याला भ्याडपणा आणि इराणमध्ये असुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे वर्णन केले आहे. मात्र, या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा दावा इराणचा एक नेता हुसेन मिर्झाये यांनी केला आहे. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा इराण आणि पाश्चिमात्य देशांमध्ये अणुकार्यक्रमावरून वाद सुरू आहे. तसेच, इराण रशियाला लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यांचा पुरवठा करत असल्याचा आरोप पाश्चात्य देशांनी केला आहे.

शस्त्रास्त्र कारखान्यावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, मात्र हल्ल्यामुळे किती नुकसान झाले आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इराणने असेही म्हटले आहे की, असे हल्ले त्यांच्या शांततापूर्ण आण्विक कार्यक्रमाची प्रगती थांबवू शकत नाहीत. बेंजामिन नेतन्याहू इस्रायलमध्ये सत्तेत आल्यानंतर इराणवरचा हा पहिलाच हल्ला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page