संगमेश्वर- संगमेश्वर मधील पागळी येथील प्रसिद्ध उद्योजक श्री अभय शेठ गद्रे यांच्या निवासस्थानी साप्ताहिक पोलीस तपास वार्तापत्र चे सहसंपादक व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक श्री सुरेश भाऊ विठोबा साळवी या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संगीत अलंकार पदवी प्राप्त गायिका कुमारी निहाली अभय गद्रे हिचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
निहाली अभय गद्रे या शास्त्रीय संगीत अलंकार पदवी प्राप्त आहेत. निहाली गद्रे या लहानपणापासून लहानपणापासून गायन करतात. पंचक्रोशी मध्ये विविध मंदिरांमध्ये त्यांनी भक्ती गीताचे कार्यक्रम केलेले आहेत. तसेच शास्त्रीय संगीताच्या विविध कार्यक्रमांमध्ये हे त्यांनी सहभाग घेतलेला आहे. शास्त्रीय संगीतामध्ये त्या प्राविण्य मिळवलेल्या असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचे नाव आहे. निहाली गद्रे यांना त्यांच्या आई सौ दीप्ती गद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन व त्यांचा गायनाचा वारसा त्यांना प्राप्त झाला आहे. यांचे वडील अभय गद्रे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याने गायनामध्ये मी प्रगती करू शकलो असे यावेळी निहाली गद्रे यांनी सांगितले.
तसेच सरफरे विद्यालय बुरंबी हायस्कूलचे होतकरू खेळाडू व विद्यार्थी कुमारी श्रावणी मोहन चव्हाण हिचा सत्कार गायिका नेहाली गद्रे व सुरेश साळवी यांच्या हस्ते करण्यात आला. सदर वेळेला पत्रकार नियाज खान, संपादक मुजीब खान यांचा उद्योजक अभय गद्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
सदर वेळेला गायिका व सामाजिक कार्यकर्त्या दीप्ती ताई गद्रे व त्यांचा परिवार उपस्थित होता. गायिका निहाली गद्रे व श्रावणी चव्हाण या दोन्ही कलावंत व क्रीडा खेळाडू यांच्या भावी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमांमध्ये माननीय सुरेश भानू साळवी यांचा अभिषेक शेट गद्रे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.