गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा युवा सांस्कृतिक महोत्सव झेप २०२३ चा दुसरा दिवस रंगमंचीय कार्यक्रमाने बहरला
50 वर्षाची परंपरा असलेल्या दांडेकर मानचिन्ह अभिनय सन्मानसाठी नाट्य, नाटुकले , पथनाट्य, एकपात्री, द्विपात्री, प्रहसन सादरीकरण करून विद्यार्थांनी आपल्या रंगमंचीय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या नाट्य कलाप्रकरातील सर्वोत्कृष्ट अभिनेता दांडेकर मानचिन्ह अभिनय सन्मान प्राप्त करतो. यावर्षी शुभम आंब्रे याला हा सन्मान प्राप्त झाला. सुत्रसंचलन स्किट आणि द्वीपात्री अभिनय सपर्धेमध्ये शुभम आंब्रेने सहभाग घेतला होता.
खातू नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे विजेत्यांना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य. डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर , डॉ. चित्र गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, झेप समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, विद्यार्थी सचिव कुणाल कवठेकर, परिक्षक प्रा. श्रावणी विभूते, प्रा. नीता खामकर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
एकपात्री स्पर्धेत तृतीय क्रमाक कु.आर्या वंडकर व साक्षी बने यांना प्राप्त झाला, द्वितीय पुरस्कार गिरीजा चितळे तर प्रथम पुरस्कार कु. कौशल मोहिते व शुभम गोविलकर यांना प्राप्त झाला. द्विपात्री स्पर्धेत शुभम आंब्रे व तेजस साळवी यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. स्कीट स्पर्धेत घुसखोर घुसलाय या स्कीट ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
वैयक्तिक व सामुहिक रांगोळी प्रकरात अनुक्रमे सारथी जाधव , इशा पांचाळ यांना तृतीय, स्नेह गुरव , चैत्राली कुडतेरकर यांना द्वितीय तर हर्षदा रिसबूड , चंदना बापट , पूजा भडभडे यांना प्रथम कर्मक प्राप्त झाला. वैयक्तिक रांगोळी प्रकारात कु. पायाल मोहिते, अमिषा सुवारे, वैष्णवी मांजरेकर यांना तृतीय, द्वितीय व प्रथम क्रमांक प्राप्त झाला. पोस्टर पेंटिंग मध्ये मधुरा राऊत, अद्वेता पावसकर, वरद घाणेकर यांनी अनुकमे तृतीय, द्वितीय व प्रथम क्रमांक प्राप्त केला. ओन दी स्पॉट पेंटिंग स्पर्धेत साक्षी भाटकर, हर्ष कांबळे, अद्वेता पावसकर यांनी तृतीय ,द्वितीय व प्रथम पारितोषिक पटकाविले.मेहंदी स्पर्धेत कु. श्रुती बनप, कु. आझमीन साखरकर , कु. सबरीना मजगावकर यांनी अनुक्रमे तृतीय, द्वितीय व प्रथम पारितोषिक प्राप्त केले.
विद्यमान वर्षीचा व गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सांस्कृतिक वारसा जोपासणारा मानाचा दांडेकर मानचिन्ह अभिनय सन्मान चिन्ह पुरस्कार कु. शुभम आंब्रे यांस प्राचार्य. डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नव- उद्योजक स्पर्धेत आजच्याही दिवशी अनेक स्पर्धकांनी भाग घेतला . आईस्क्रीम , चॉकलेट , केक, व गावरान ठसका , आंबट गोड, असा मेनू नव – उद्योजक विक्रेत्यांनी आपल्या कल्पनेतून मांडणी करून विकण्यास ठेवला. अनेक प्राध्यापक व विद्यार्थी ग्राहकांनी याचा आस्वाद घेतला . मनोरंजन व उद्योजक कौशल्य यांनी उत्साह वाढविणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थांनी विविध रंगी वेशभूषा करून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.