
*नेरळ: सुमित क्षिरसागर –* श्री स्वामी समर्थ प्रकट दिन नेरळ मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकट दिनाच्या निमित्ताने
भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली.

मातोश्री नगर मध्ये प्रकट दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने श्री स्वामी समर्थ मंडळ मातोश्री नगर येथून सालाबादप्रमाणे नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.श्री स्वामी समर्थ गार्डन मधून प्रस्थान होऊन साईबाबा मंदिरामध्ये पूजा करून मातोश्री नगर कमानीच्या येथे श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री शंकर महाराज यांच्या प्रतिमा घेऊन वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात श्री स्वामी समर्थ गार्डन येथे आगमन झाले. व प्रकट दिनाच्या दिवशी पादुका व प्रतिमा पूजन करण्यात आले. दुपारी स्वामीची आरती नामजप सायंकाळी स्वामी स्तवन व महाआरती करण्यात आली. त्या नंतर स्वामी भक्तांना महा प्रसाद देण्यात आला.

रात्री ९.३० वाजता सुरेल स्वामी गीतांचा व भक्ती गीतांचा कार्यक्रम स्वरानुभूति सादर करण्यात आला. कार्यक्रम पारपाडण्यासाठी प्रीतम गोरी, एकनाथ दुर्गे, पंढरीनाथ चंचे, सचिन चित्रे, मंगेश कुलकर्णी, मनोज मानकामे, रमेश पवार, रवी सावंत, सुहास ताम्हाणे व मंडळाच्या महिलावर्ग सर्व स्वामी भक्त यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.