सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. नेरळचा राजा व व्यापारी फेडरेशन नेरळ यांचा संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मभूमी विजयी यात्रा संपन्न….
नेरळ- सुमित क्षीरसागर अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त देशभर प्रभू श्री रामाचा उत्सव सुरू झाला यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नेरळ शहरात अनेक मंदिरांत महापूजा, आरती, महाप्रसादाचे वाटप होत आहेत. तर सामाजिक कार्यकर्त्यांकडून दोन दिवसांपूर्वीच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले असून हर घर मे हर गली मे राम नावाचा गजर गुंजला असून राम उत्सव साजरा होताना दिसत आहे. अयोध्येमध्ये अतिभव्य श्री रामजन्मभूमी मंदिराचे लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे.यासाठी गेल्या काही दिवसापासूनच देश भरात राम उत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली.नेरळ परिसरात सामजिक कार्यकर्ते,सरपंच,उपसरपंच,सदस्य,संघ परिवार,विविध राजकीय नेते पुढारी,महिला वर्ग,लहान मुलांपासून वयोवृद्ध एकत्र आले असून रामललाचा उत्सव साजरा करताना दिसतात,नेरळ भैरवनाथ दूध डेअरीचे मालक कैलास डांगी हे आपले गाव उदयपूर येथून अयोध्याला अकराशे किलोमीटर सायकल चालवत अयोध्येत निघाले तर एकीकडे नेरळ शहरातील सर्व मंदिरे साफसफाई करून पाण्याने धुण्यात आली होती,घरोघरी आज सकाळ पासूनच रांगोळ्या दिवे,कंदील,लाईट लावून दिवाळी सण साजरा होताना दिसला,त्याच सोबत आज पहाटे पासून मंदिरात पूजा,अर्चा होम हवन,भजन किर्तन तर रामायणाचे पारायण,सांस्कृतिक कार्यक्रमाची धामधूम सुरू होती.विद्या विकास मंदिर व LAES शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरात श्री रामाची पालखीची रॅली काढली होती,यामध्ये शेकडो विद्यार्थी व शिक्षक सहभागी होते तर श्री राम,सीतामाई,लव्हकुश,भक्त हनुमान यांचे रूप साकारत भक्तांना रामाच्या रुपात दर्शन देताना दिसले,तर अयोध्यातील राम मंदिर येथील सजवलेल्या कार रथावर दाखवण्यात आला होता.रस्त्यावर रांगोळ्या काढीत नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून व व्यापारी फेडरेशन कडून शहरात विविध उत्सव साजरा करताना दिसून आले,यासाठी शहरात श्री रामाचा मोठ्या प्रमाणात उंच असा बॅनर देखील लावण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.तर सायंकाळी शहरातून श्री रामजन्मभूमी विजय यात्रा काढण्यात आली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आज संपूर्ण कर्जत तालुक्यात,शहरात,गावात,गल्लीत श्री राम उत्सव साजरा होतानाचे चित्र दिसत होते तर प्रत्येकाच्या वाहनावर भगवा झेंडा तर मुखात प्रभू श्री रामाचे नाव गुंजत होते.
जाहिरात