हैदराबादचा पराभव करत कोलकाता फायनलमध्ये; श्रेयस-व्यंकटेशची नाबाद अर्धशतके…

Spread the love

अहमदाबाद l 22 मे’ आयपीएल 2024 स्पर्धेच्या फायनलच्या तिकिटासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मंगळवारी सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) क्वालिफायर-1 सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने राहुल त्रिपाठीच्या 55 धावांच्या जोरावर 19.3 षटकांत 159 धावा केल्या, पण केकेआरने श्रेयस आणि वेंकटेशच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 13.4 षटकांत दोन गडी गमावून 164 धावा करत सहज विजय मिळवला. कर्णधार श्रेयसने 24 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा तर वेंकटेश अय्यरने 28 चेंडूत पाच चौकार अन् चार षटकारांच्या साह्याने नाबाद 51 धावांची खेळी केली.

एका बाजूने विकेट पडत असताना राहुल त्रिपाठीसह हेनरिक क्लासेनने डावाची धुरा सांभाळली आणि अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, राहुल त्रिपाठी 35 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावा करून धावबाद झाला. त्याच्याशिवाय क्लासेनने 21 चेंडूत 32 आणि कमिन्सने 24 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. त्यामुळे हैदराबाद संघ 19.3 षटकात सर्वबाद 160 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

कोलकाताकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर चक्रवर्तीने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय अरोरा, राणा, नरेन, रसेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. हैदराबादकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकाताकडून चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी रहमानउल्ला गुरबाज आणि सुनील नरेन यांनी 44 धावांची भागिदारी केली. परंतु गुरबाज 14 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला. यानंतर थोड्यावेळाने नरेन 16 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाला. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी संघाची धुरा सांभाळली.

वेंकटेश अय्यरने 28 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा, तर श्रेयस अय्यरने 24 चेंडूत श्रेयसच्या 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा करत कोलकाता संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे कोलकाता संघाने 13.4 षटकातच 164 धावा करत क्वालिफायर-1 मध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला आणि IPL 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. तर दुसरीकडे पराभवानंतरही हैदराबादचा संघ स्पर्धेबाहेर गेलेला नाही.

हैदराबादला आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. हैदराबादचा सामना आता पुढील सामना बुधवारी (22 मे) क्वालिफायर-2 मध्ये आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी होणार आहे. क्वालिफायर-2 मधील विजेत्या संघाचा सामना रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात कोलकाता संघाशी होईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page