श्रीकृष्ण खातू /धामणी – पुणे येथील बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय जूनियर कराटे अजिंक्य स्पर्धा२०२४ मध्ये ब्रांझ पदक मिळवून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे तसेच संगमेश्वर तालुक्यातील फुंणगुस गावचे नाव उज्वल करणारी फुणगुस कन्या श्रावणी विजय गुरव ही ठरली असून प्रीमियर लीगची फुणगुस पुन्हा एकदा यशस्वी घोडदौड सुरू केली आहे.
श्रावणीच्या यशाबद्दल फुंणगुस पंचक्रोशीतील बांधवांनी व माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर इत्यादींनी तिचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केले आहेत.