
मुंबई (शांताराम गुडेकर )
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)शिव आरोग्य सेनेच्या वतीने संघटनेच्या अध्यक्षा डॉ.शुभा राऊळ,कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार तसेच नवी मुंबई विभागीय समन्वयक श्री.प्रविण वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिव आरोग्य सेनेतर्फे सामान्य नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जन आरोग्य अभियान ” दिनांक १०-७-२०२३ ते १९-७-२०२३ रोजी संपन्न झाले.या अभियाना अंतर्गत ऐरोली व बेलापूर विधानसभा मधील ए वॉर्ड, जी वॉर्ड,बी वॉर्ड,सी वॉर्ड,ई वॉर्ड,एफ वॉर्ड व डी वॉर्ड या सर्व वार्ड अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.पावसाळ्यात होणारे साथीचे आजार व नाले सफाई अशा अनेक गोष्टीवर प्रत्येक वार्ड अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.घणसोली विभागात जन आरोग्य अभियान दिनांक ११-७ -२०२३ रोजी राबविण्यात आले. त्याला अनुसरून दि.१८-७-२०२३ रोजी घणसोलीत पालिकेला डेंग्यूचा पहिला रुग्ण आढलून, त्यासाठी घणसोली वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली व त्यावर प्रशासनाने योग्य प्रतिसाद देऊन यंत्रणा सज्ज केली.या अभियानात शिव आरोग्य सेने च्या पदाधिकारी व शिवसैनिक यांनी सहभाग घेतला.श्री.अक्षय गोरे (आरोग्य संघटक ऐरोली विधानसभा)श्रीकांत साळवी( समन्वयक बेलापूर विधानसभा ),अविनाश गोळे (समन्वयक ऐरोली विधानसभा ), राकेश यादव(आरोग्य संघटक बेलापूर विधानसभा), तर समन्वयक सचिव रोहित शिरसट, राजेश काळे, युगांतर लोखंडे, मनोज राऊत, मंजुळा म्हात्रे, केशव शिंदे, नमिता सुरवसे, संकेत मोरे, अनिरुद्ध नरुटे, तसेच शिवसेना पदाधिकारी श्रीकांत हिंदळेकर, संदीप पवार, डॉ शिवकुमार नायकवडे, आशा शिंदे, ज्योती पवार, वैजयंती म्हात्रे, अर्चना कंक, योगेश खुटवड,रत्नप्रभा जाधव, प्रणय म्हात्रे,यशोदा चासकर, मंगला बालपुरे,वेदांत गव्हाणे, प्रताप पिसाळ,आशिष गव्हाणे,सुशांत जाधव, प्रसाद देवडकर, पवन नागवडे हे सर्व शिवसेना – युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.