शिवसेना जिल्हा कार्यकरणीची सभा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न
रत्नागिरी (प्रतिनिधी) : येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेना-भाजप- राष्ट्रवादीचा असेल. त्यासाठी कामाला लागा असे आदेश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची सभा महाराष्ट्रचे उद्योगमंत्री – पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
या सभेला पालकमंत्री ना.उदयजी सामंत पक्षाच्या विविध पदाधिकारी यांचा आढावा घेतला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना घरा-घरा पर्यत पोचवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश ना.उदयजी सामंत यांनी दिले.पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमात काम करून संघटना वाढवणे गरजेचं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आपल्याला शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी यां तीन पक्षाना एकत्र घेवून लढवायच्या आहेत. त्यासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे. जनतेला हवा असलेला विकास आणि न्याय देण्यासाठी संघटनेने पुढे येणे गरजेच आहे. सध्या पावसाच्या दृष्टीने आपल्या जवळपास लोकांना संकटात मदत करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.
यावेळी आमदार योगेश कदम, उपनेते सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख राहुल पंडित आणि शशिकांत चव्हाण, अरुण कदम, मनोहर बाईत, राजन शेट्ये, प्रकाश साळवी, राजेश मुकादम, सुभाष कळेकर, शिल्पा सुर्वे, बाबू म्हाप, प्रमोद पवार, अशपाक हाजू, शिल्पा सुर्वे, आदी सह सर्व तालूका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.