निवडणूक रोख्यांतून शिवसेनेलाही कोट्यवधींचा निधी, रिलायन्सशी संबंधित असलेल्या ‘या’ कंपनीने दिली देणगी!…

Spread the love

*निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत क्विक सप्लाय चेन ही कंपनी तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे…

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक रोख्यांचा विषय प्रचंड चर्चेत आहे. कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला कितीचं दान दिलं यावरून खलबतं सुरू आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आता सर्व माहिती निवडणूक आयोगाला दिली असून निवडणूक आयोगाने ही माहिती त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यानुसार, भारतीय जनता पक्षाला या निवडणूक रोख्यांचा सर्वाधिक फायदा झालाय. तर, अनेक राज्यातील स्थानिक पक्षांनीही निवडणूक रोख्यातून निधी वटवला आहे. शिवसेनेलाही या रोख्यातून निधी मिळाला आहे.

भाजपा आणि शिवसेनेला निधी..


नवी मुंबईतील धिरूभाई अंबानी नॉलेज सिटी येथील क्विक सप्लाय चेन प्रा.लिमिडेट कंपनीने भाजपा आणि शिवसेनेला निधी दिला आहे. रियालन्स समूहाशी संबंधित असलेल्या या कंपनीने ३८५ कोटी भाजपाला आणि २५ कोटी शिवसेनेला दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुरुवारी सादर केलेल्या अहवालात ही आकडेवारी आहे.

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत क्विक सप्लाय चेन ही कंपनी तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. २०२१-२३ आणि २०२३-२४ या काळात या कंपनीने ४१० कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. यापैकी ३९५ कोटी भाजपाला आणि २०२२ मध्ये शिवसेनेला २५ कोटी दिले होते. गोदामे आणि स्टोरेज युनिट्स असलेल्या या कंपनीने भाजपा आणि शिवसेना व्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय पक्षांना निधी दिलेला नाही.

Qwik सप्लाय एक असूचीबद्ध खाजगी कंपनी असून ९ नोव्हेंबर २००० रोजी १३०.९९ कोटी रुपयांच्या अधिकृत भागभांडवलासह स्थापन करण्यात आली. फर्मचा २०२२-२३ मध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल होता. २०२१-२२मध्ये राजकीय पक्षांना देण्यासाठी ३६० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. त्याचवर्षी या कंपनीचा निव्वळ नफा २१.७२ कोटी रुपये होता. २०२३-२४ मध्ये आणखी ५० कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. या कंपनीचे तीन संचालक आणि एक प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page