
हुरा रे हुरा ! आमच्या निनावीला सोन्याचा तुरा !!…
संगमेश्वर / दिनेश अंब्रे – कोकणातील संगमेश्वर येथील श्री . निनावी देवीचा शिमगोत्सव गेली अनेक वर्षे विधीवत संपन्न होत असून असंख्य भक्तगण दूरवरून देवीच्या भेटीसाठी व दर्शनासाठी येत असतात
याही वर्षी निनावी देवी प्रासादिक मंडळातर्फे अध्यक्ष व मानकरी दत्ताराम (बावा ) सुर्वे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जल्लोषात व उत्साहात पार पडला.
होलीको उत्सवातील श्री निनाई देवी व वरदान देवी दोन्ही माड नाचवताना उसळलेली भक्त मंडळींची गर्दी लक्षणीय होती.यामध्ये मानकरी भक्तगण वाजंत्री पिपाणी ढोल ढोलाच्या ठेक्यावर नाचणारे भक्तमंडळी सर्वांचे आकर्षण ठरली होती. रूढी परंपरेनुसार पालखी दिवाण वाड्यावर नाचवून दर्शन घेणे ,ओटी भरणे हातभेट नारळ देणे हा कार्यक्रम झाल्यावर पालखी पुढे मार्गस्थ झाली . व प्रथेप्रमाणे- घरोघरी पुजनासाठी सुरू झाली.
त्यानंतर शिमगोत्सवाची सांगता करताना विद्युत रोषणाईने, सुंदर रांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी ,यामुळे तरुणानी पालखी नाचवून आनंद लुटता. संकासूराने धारण केलेले रूप त्याचे नृत्य हे सर्वांना खूपच भावले. गल्लोगल्ली देवीची ओवाळणी करण्यासाठी अनेक भगिनी खूप वेळ रांगेत उभ्या होत्या. अशाप्रकारे संपन्न होत असतांना हुरा रे हुरा,आमच्या निनावी ला सोन्याचा तुरा,असे अनेक फाग घालून सांगता करण्यात आली.
मानकरी दत्ताराम (बावा)सुर्वे यांनी समाधान व्यक्त करून सर्व भक्तगणांचे कौतुक केले. व आभार मानले. तेव्हा बावा सुर्वे म्हणाले की,शिमग्यात उत्सव होतो,तीच असते ग्राम देवता! आणि भक्तांच्या आयुष्यात कधीही ठेवत नाही कशाचीही कमतरता ! या साठी संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या अधिकारी, व कर्मचार्यांचे उत्तम सहकार्य लाभले.