
*श्रीकृष्ण खातू /धामणी –* श्रीकृष्ण ग्रामस्थ मित्र मंडळ कुंभारखाणी खुर्द (रजि.) गावणवाडी -मुंबई आयोजित “श्री सत्यनारायणाची महापूजा २०२५ व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचे औचित्य साधून समाज मंदिराच्या सभा मंडपाच्या शेडचा उदघाटन सोहळा प्रशांत यादव अध्यक्ष वाशिष्ठी मिल्क अ़ॅन्ड मिल्क प्राॅडक्ट्स प्रा.लि.यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाली. याच दरम्यान या वाडीची वार्षिक होणारी श्री सत्यनारायणाची महापूजा सुद्धा मोठ्या भक्ती भावाने, तालासुरात आरती गायनाने पार पडली. या निमित्ताने प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी हळदीकुंकू समारंभात असंख्य भगिनीनी लाभ घेतला. व सायंकाळी उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन,व मान्यवरांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. रात्री खास मनोरंजन , करमणुकीसाठी श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरूख कोल्हेवाडी यांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला.


सदर कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले सन्मा. श्री प्रशांत यादव साहेब अध्यक्ष -(वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा लि.),सन्मा. श्री अविनाश कांबळे साहेब (विश्वस्त – महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रष्ट शाखा संगमेश्वर ), सन्मा. श्री सदानंद चव्हाण साहेब (माजी आमदार संगमेश्वर चिपळूण विधानसभा ), सन्मा. श्री गणेशभाऊ चाचे (समाजसेवक ), सन्मा.श्री संतोष थेराडे साहेब (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी ), सुभाष नलावडे (माजी सभापती)यशवंत टोपरे ( संचालक – यादव समाज नागरी सह. पतपेढी), सन्मा. श्री बाळा पंदेरे साहेब ( समाजसेवक ), सन्मा, श्री तुकाराम मेस्त्री साहेब (संपर्कप्रमुख- तालुका संगमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या सह अनेक मान्यवर मंडळींचा मंडळाच्या वतीने यथोचित मान सन्मान करण्यात आला.

महाप्रसाद आणि संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला,मंडळातील कार्यकर्ते, ग्रामस्थ, हितचिंतक या सर्वांनी खूप खूप मेहनत घेतली. मंडळास वेळीवेळी सहकार्य करणारे मंडळाचे सर्व सभासद, ग्रामस्थ, हितचिंतक व दानशूर देणगीदार यांचे मनपूर्वक आभार मानन्यात आले.