संगमेश्वर :- शिवसेना उपनेते,पालकमंत्री श्री.उदय सामंत व श्री. किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होवुन उबाठा गटाच्या अनेक कार्यकर्त्यानी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.
कार्यकर्त्याना मिळणारी सन्मानाची वागणूक व एकंदर रत्नागिरी जिल्हात होणाऱ्या विकास कामांने प्रभावित होवुन संघटना मजबुत करण्यासाठी पालकमंत्री श्री.उदय सामंत यांचे हात आणखीन बळकट करण्यासाठी भिरकोंड तालुका संगमेश्वर येथील उध्दव ठाकरे गटाच्या अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती महेश देसाई यानी दिली.
या वेळी जिल्हाप्रमुख श्री.राहुल पंडित व उपजिल्हाप्रमुख श्री. राजेश मुकादम; कसबा जिल्हा परीषद गट विभागप्रमुख श्री.महेश देसाई उपस्थित होते.
सदर पक्षप्रवेश करण्यासाठी विभाग प्रमुख श्री. महेश देसाई यांनी विशेष प्रयत्न केले असुन आगामी काळात अनेक गावातुन पक्ष प्रवेश पाहायला मिळतील असे त्यांनी सांगितले.
श्री. दिनेश खानविलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांची नावे…
दिनेश शांताराम खानविलकर; स्वप्निल अनंत गोरे; महादेव दोंडू गुरव; नितिन रामचंद्र गुरव; रुपेश पांडुरंग गुरव; प्रभाकर रामा गुरव; राजाराम गोविंद मोरे; प्रशांत प्रभाकर गुरव; उमेश हरिश्चंद्र गुरव; दिक्षा दिनेश खानविलकर; शुभांगी एकनाथ शिंदे; शुभांगी एकनाथ शिंदे; सुषमा महादेव गुरव; अर्चना नारयण आरवलकर; सुभाष महादेव गुरव; संगिता चंद्रकांत आरवलकर; भालचंद्र बाळ्या गुरव.