
विरार : होळी, धुळीवंदन अर्थात महाराष्ट्रातील शिमगोत्सव. दिवाळीनंतर सर्वात मोठा कोणता सण साजरा होत असेल तर तो आहे होळीकोत्सव. यंदा वसईत एकगाव एक होळीकोत्सव असे चित्र पाहायला मिळाले. त्याच धर्तीवर कोकणातील पारंपरिक ‘खेळे’ चे विरार पूर्वेतील कारगिलनगरमध्ये दर्शन घडले. शिमगा म्हणजे कोकणचा. असे एक समिकरण आहे. मात्र या समिकरणाचे खऱ्या अर्थाने दर्शन विरारमध्ये पहावयास मिळाले. त्यामुळे विरारमधील नागरिकांनादेखील कोकणच्या शिमगोत्सवाचे अर्थात खेळे’ चे प्रदर्शन पाहायला मिळाले.
रत्नागिरी गुहागर मधील सर्व ग्रामस्थ मिळून दरवर्षी प्रमाणे ह्या
ही वर्षी कारगिल नगर विरार पूर्व इथे कोकणचे ‘खेळे’ पाहायला
मिळाले. हे ग्रामस्थ विरारमध्ये विविध भागात राहत असून होळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येतात. पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतुने कोकणचे ‘खेळे’हा जग प्रसिध्द असलेला खेळ पारंपरिक रमध्ये जल्लोष आता कोकणातच नाही तर गेली
5-6 वर्षापासून विरारमध्ये देखील पाहायला मिळतो. ह्यामध्ये गोमू आणि सांकासुर हे आकर्षण असते. परंतु कोकणात ह्यांना देवाचे स्थान दिले जाते त्यामुळे ते एक देवाचे रूपच जणू गाण्याच्या तालावर सकासुर नाचतात, आरती आणि करतात आणि देवाला गाऱ्हाणे बोलतात.मंगळवारी विरारमध्ये काही ठिकाणी कोकणी बांधवांकडुन शिमगोत्सवाचा पारंपरिक ठसका अनुभवायाला मिळाला. तसेच एकमेकांना रंग लावून होळी सणाचा विरारकरांनी आनंद लुटला.
जाहिरात


