डिजिटल दबाव वृत्त
आपल्याकडे एवढे चांगले उमेदवार होते, आपण एवढी कामं केली, पण लोकांनी (मतदानावेळी) चूक केली. पण यावेळी लोक चूक करणार नाहीत”, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
लोकसभा निवडणूक मनसे लढवणार असल्याचं जाहीर झाल्यापासून शर्मिला ठाकरे अनेकाविध राजकीय भाषणेही करत आहेत. या भाषणांतून त्या सातत्याने सत्ताधारी युती आणि महाविकास आघाडीवर तोफ डागत आहेत. काल पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी कोविड काळात सत्ताधारी पक्ष बंगल्यात बसून होते, अशी अप्रत्यक्ष टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पुण्यातील कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका आरती बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
“मार्च- एप्रिल महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील. मग ऑक्टोबरमध्ये आमदारकीच्या निवडणुका. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका लागतील. पण तरीही आमची कामं थांबत नाहीत. आम्ही निवडून येवो किंवा न येवो आमच्या पक्षातील कामे सुरू असतात :- शर्मिला ठाकरे
जाहिरात