रत्नागिरी :- काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारीपदी शंकर बर्गे यांची नियुक्ती झाली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले. रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी असलेले संजय शिंदे यांची काही महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते.
या रिक्तपदी शंकर बर्गे यांची नियुक्ती झाली आहे. बर्गे यांनी यापूर्वीही रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे. तसेच रत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.सध्या ते सिंधुदुर्ग येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.