
*रत्नागिरी-* रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन होण्याचे काम प्रलंबित आहे. रेशन कार्ड १२ अंकी झाल्याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाचा आर्थिक लाभ मिळण्या पासून अनेक ज्येष्ठ नागरिक वंचित राहिलेले आहेत. या कामासाठी तहसीलदार कार्यालयात वारंवार जाणे टाळण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेबाना भेटून वस्तुस्थिती त्यांच्या नजरेला आणून दिली आणि या कामाला गती येऊन ज्येष्ठ नागरिकांची सोय करण्यासाठी मा. तहसीलदार रत्नागिरी यांनी गुरुवार दिनांक २२ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या *शिवाजी नगर (नरहर वसाहत) येथील सभागृहात* विशेष कॅम्प आयोजित केला आहे.
ज्यांना या सेवेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या सोबत खालील कागद पत्रांच्या झेरॉक्स प्रति घेऊन उपस्थित रहावे.
1. रेशन कार्ड
2. रेशन कार्ड मध्ये असलेल्या सर्व सदस्यांची आधार कार्ड
3. ग्यास नोंदणी पुस्तकं (पास बुक)
4. उत्पन्नाचा दाखला (असल्यास)
5. कुटुंबामध्ये कोणी दिव्यांग असल्यास त्याचा दाखला.
.असे आवाहन रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष श्री सुभाष थरवळ यांनी केले आहे.
ही सुविधा संघाच्या सभासदांना तसेच अन्य ज्येष्ठ नागरिकांनाही उपलब्ध आहे.