
सोनगिरी गावच्या पोलीस पाटीलपदी विनेश टाकळे यांची निवड….
संगमेश्वर:- नव्याने जाहीर झालेल्या जिल्हा पोलीस पाटील पद भरतीत संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी गावच्या पोलीस पाटील पदी विनेश कृष्णा टाकळे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री विनेश कृष्णा टाकळे हे मनमिळाऊ स्वभावाचे असून त्यांचा सामाजिक तसेच धार्मिक कार्याशी चांगलाच सबंध असून कायदा आणि सुव्यस्था याचे पालनकर्ते आहेत. त्यांचे वडील शेतकरी असून आईवडिलांच्या आणि मोठ्या भावाच्या आशीर्वादामुळे आज या पदापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. सोनगिरी गावच्या पोलीस पाटीलपदी विनेश टाकळे यांची प्रशासनाकडून निवड झाल्याचे समजताच गावाला एक
पोलिस पाटील पदाचे युवा नेतृत्व मिळालं म्हणत गावातील लहानांपासून वयोवृद्धां प्रयत्न अनेकजण प्रत्यक्ष भेटून तर अनेकजण व्हाट्सअप्, तसेच कॉल करून अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.
आपल्याला मिळालेल्या पदाचा गैरवापर न करता कायदा आणि माणुसकी यांची सांगड घालूनच पोलीस पाटील या पदाची जबादारी प्रामाणिकपणे पार पडणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जाहिरात

