
संगमेश्वर/वहाब दळवी परिश्रम केल्या नंतर शंभर टक्के यश हे पदरात पडतेच.यश पदरात पडल्यावर आंनद आणि उत्साह मिळतो.मात्र परिश्रम तर सगळेच करतात,परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात.
नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा पोलीस पाटील पद भरतीत संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावच्या पोलीस पाटील पदी प्रशांत उर्फ नाण्या सखाराम थुल यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सर्व स्तरातून केले जात आहे.
प्रशांत(नाण्या) थुल हे उच्छशिक्षित असून त्यांचा सामाजिक तसेच धार्मिक कार्याशी चांगलाच सबंध असून कायदा आणि सुव्यस्था याचे पालनकर्ते आहेत.त्यांचे वडील सखाराम थुल हे जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक असून तेही समाजकार्यात अग्रस्थानी असतात. त्यांचाच आदर्श पुढे ठेऊन समाजापुढे आदर्शवत काम करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात.पोलीस यंत्रणेलाही पोलीस मित्र असल्याप्रमाणे त्यांच्या सहवासात राहणे घडलेल्या घटनेवेळी सहकार्याची मदत लागल्यास सहकार्य करणे यामुळे कायद्याचा अभ्यासही त्यांना ज्ञात झाला आहे.
फुणगूस गावच्या पोलीस पाटीलपदी प्रशांत(नाण्या)थुल यांची प्रशासनाकडून निवड झाल्याचे समजताच खाडीभाग दशक्रोशीतील लहानांपासून वयोवृद्धां प्रयत्न अनेकजण प्रत्यक्ष भेटून तर अनेकजण व्हाट्सअप्प,इन्स्टाग्राम,फेसबुक तसेच कॉल करून अभिनंदनाचा वर्षाव व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.
आपल्याला मिळालेल्या पदाचा गैरवापर न करता कायदा आणि माणुसकी यांची सांगड घालूनच पोलीस पाटील या पदाची जबादारी प्रामाणिकपणे पार पडणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.