आमचा इको फ्रेंडली साबण : नितीन गडकरी काय म्हणले, पहा सविस्तर

Spread the love

नवी दिल्ली :- डागाळलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे. सुरुवातीला भाजपाच विरोधी पक्षांच्या ताकदवर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते, चौकशा लावते आणि नंतर त्या नेत्यांना भाजपात घेतले जाते. या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाकडे इको फ्रेंडली साबण असल्याचे म्हटले आहे.
आजतकच्या एका कार्यक्रमात गडकरी सहभागी झाले होते, यावेळी त्यांना यावर प्रश्न विचारण्यात आला. भाजपने बनवलेला साबण प्रत्येक डागाळलेल्या नेत्याला वॉशिंग मशीनमध्ये साफ करतो का ? असे विचारले असता गडकरी आधी हसले. आमचा इको फ्रेंडली साबण आहे. बघा, राजकारणात लोक येतात आणि जातात. गोष्टी घडत राहतात. जनता पक्षापासून बघा, ४७ नंतर बघा. हे सर्व असेच चालू आहे. राजकारण हा रचना, मर्यादा आणि विरोधाभासाचा खेळ आहे आणि निवडणुकीत जिंकण्याचे राजकारण सर्वात महत्वाचे आहे आणि जो जिंकतो तो सिकंदर. कधी कधी युतीत मित्र घ्यावे लागतात, लोक येतात. आम्हालाही आमची ताकद वाढवायची आहे, असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले.
मी निवडणुका पाहून काम करत नाही, रस्ते बांधले की लोक स्वतःच प्रसिद्ध करतात. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल. इलेक्ट्रिक वाहनांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, देशात इलेक्ट्रिक वाहनांची प्रतीक्षा यादी आहे. इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक मर्सिडीजही सुरू करण्यात आल्या आहेत. तुम्ही पेट्रोल आणि डिझेल वाहनावर महिन्याभरात २८ किंवा ३० हजार रुपये खर्च करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक वाहनावर २ हजार रुपये खर्च करता आणि अशा प्रकारे तुमची एका महिन्यात २८ हजार रुपये वाचवत आहात, असे गडकरी म्हणाले.
राहुल गांधींनी आरएसएस आणि केंद्र सरकारवर केलेल्या वक्तव्यावर गडकरी यांनी हे अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे परिपक्वतेचे लक्षण नाही. विरोधात असताना विरोध करावा लागतो, विरोधात बोलायचे असते हे मला माहीत आहे. या प्रकरणात काही तथ्य आहे, असे लोकांना वाटले पाहिजे, असे बोलण्याचा मी त्यांना सल्ला देईन असे गडकरी म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page