
ठाणे ; निलेश घाग डोंबिवली स्थानकाजवळ एका अज्ञात व्यक्तीनं एसी लोकलवर दगडफेक केली. सदर घटनेत एसी लोकलचं नकुसान झाले असुन. सदर घटना सकाळी ८ च्या सुमारास एसी लोकल ठाकुर्ली आणि डोंबिवलीच्या मध्ये पोहोचली असता एका अज्ञात व्यक्तीनं एसी लोकलवर दगडफेक केली. या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
AC लोकल दगडफेक प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती महिती मिळालेल्या सूत्रानुसार सकाळी ८ च्या सुमारास एसी लोकल ठाकुर्ली आणि डोंबिवलीच्या मध्ये पोहोचली असता अचानक अज्ञात व्यक्तीकडून एसी लोकलवर दगड फेक करण्यात आली. या घटनेत एसी लोकलचं मोठं नुकसान झालं आहे. डब्यांच्या काचा फुटल्या आहेत. अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेक का आणि कश्यासाठी करण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही कारण समोर आलेल नाही.



जाहिरात
