
डिजिटल दबाव वृत्त
ठाणे ; निलेश घाग भाजप आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारामुळे ठाण्यातील सफाई कामगारांना हक्काची घरे मिळणार आहेत. महागिरी येथील या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमीपूजन आ. केळकर यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी माजी नगरसेविका नम्रता कोळी,भाजप उपाध्यक्ष जयेंद्र कोळी,परिवहन सदस्य विकास पाटील, शांताबेन सोलंकी,विशाल वाघ आणि विकासक मुनीरभाई आदी उपस्थित होते.
ठाणे पश्चिमेकडील बाजारपेठेलगत महागिरी परिसरातील राम मंदिर येथे वास्तव्य करणाऱ्या सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. ठाणे महापालिका सेवेत असणाऱ्या सफाई कामगारांची असलेल्या इमारती धोकादायक असल्यामुळे त्यांना घरे रिकाम्या करण्यात येऊन, सफाई कामगार इतरत्र तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.गेली पाच वर्षे ह्याचा पाठपुरावा आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरु होता.या गेली कित्येक वर्ष रखडलेल्या श्रीराम को ऑप हौसिंग सोसायटी महागिरी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा अखेर गुरुवारी आ. केळकर यांच्या हस्ते पार पडला.
एकीकडे संपूर्ण देशात राममंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा जल्लोष आणि श्रीराम को ऑप हौसिंग सोसायटीचे भूमिपूजन आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याने करण्यात आल्याने एकप्रकारे आमच्या मदतीला श्रीराम धावून आले. अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
जाहिरात


