
हिंदू धर्मात ‘शनि अमावस्या’ (Shani Amavasya 2025) तिथीला विशेष महत्त्व आहे. यंदा वर्षातील पहिली ‘शनि अमावस्या’ कधी आहे जाणून घ्या तारीख आणि वेळ आणि उपाय.
मुंबई प्रतिनिधी शनि, राहू-केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अमावस्या हा शनिदेवाचा जन्मदिवसही मानला जातो. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावस्या तिथीला (Shani Amavasya 2025) पितरांची पूजा केली जाते. असं केल्यानं सुख-समृद्धीत वाढ होते अशी मान्यता आहे. यंदा ‘शनि अमावस्या’ तिथी 28 का 29 मार्च नेमकी कधी आहे ते जाणून घ्या.
‘शनि अमावस्या’ नेमकी कधी आहे? :
अमावस्या तिथीची सुरुवात 28 मार्च रोजी, संध्याकाळी 7:55 पासून होणार आहे. तर समाप्ती ही 29 मार्च, दुपारी 4:27 वाजता होणार आहे. उदय तिथीनुसार शनिवार, 29 मार्च रोजी असेल. ही तिथी शनिवारी येत असल्यानं या तिथीला ‘शनि अमावस्या’ असंही म्हटलं जाईल.
शनि अमावस्या स्नानाची वेळ :
29 मार्च, पहाटे 4.42 ते 5.29
शनि अमावस्या पुजा मुहूर्त : 29 मार्च, सकाळी 5.06 ते सकाळी 10.12
अशी करा पूजा :
शनि अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावं. हे शक्य नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं. त्यानंतर देवघरात दिवा लावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. या दिवशी सकाळी लवकर शनि मंदिरात विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवावर अभिषेक करा. पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा. या दिवशी शनिदेवाला निळे फुले अर्पण करा आणि शनि चालीसा किंवा शनि स्तोत्राचे पठण करा.
शनिदेव शासन करणारा :
शनिदेवाला कर्माचा दाता आणि शासन करणारा म्हणतात. साडेसातीच्या काळात ते माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. यामुळं ‘अमावस्येच्या दिवशी’ शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी उपाय केले जातात. या दिवशी शनीच्या साडेसातीचा परिणाम कमी करण्यासाठी शनीदेवाची पूजा करावी तसेच शनीचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करावेत.
शनि अमावस्येला करा ‘हे’ उपाय-
▪️शनि अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
▪️शनि अमावस्येला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करा.
शनि देवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, शनि मंत्र आणि शनि स्तोत्राचं पठण करा.
▪️पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि अमावस्येला तांदळाची खीर बनवा.
▪️शनिदेवाची पूजा करताना 5, 7, 11 किंवा 21 वेळा मंत्रांचा जप करा आणि शनि आरती करा.
▪️पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणं पुण्यकारक मानलं जातं. या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.