संतोष दादा जैतापकर (भाजपा ओबीसी मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष) यांनी गुहागर विधानसभा मतदार संघात दिला आमदार भास्कर जाधवाना धक्का…

Spread the love

माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा मंत्री महोदय व कोकणचे सुपुत्र.तसेच गुहागर विधानसभाचे आधारस्तंभ माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

गुहागर प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सभेत… भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री संतोष जैतापकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन उबाठा गटातील गुहागर विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते यांनी मा.मंत्री महोदय मा श्री रविंद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला….

शिरगाव ग्रामपंचायत चिपळूण माजी सरपंच सुलभा मुंडेकर व त्याचे कार्यकर्ते, पाचगणी नायनाक वाडी माजी सरपंच श्री. आनंद नायनाक व कार्यकर्ते, धामणदेवी बेलवाडी ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील मेणे व कार्यकर्ते, गुहागर मधील सामाजिक कार्यकर्ते श्री आदेश जाधव व कापसाळ गाव बुद्धवाडी युवा नेतृत्व आकाश पवार व वाडीतील नागरिक अशा प्रकारे मोठया प्रमाणात संतोष दादा जैतापकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला.

त्यावेळी व्यासपीठावर आमदार श्री निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत पाटील, श्री अतुल काळसेकर, श्री.शैलेंद्र दळवी, श्री विनय नातू, श्री सूर्यकांत दळवी, श्री प्रशांत शिरगांवकर व पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वीही संतोष जैतापकर भाजपा ओबीसी मोर्चा चे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष यांनी शत प्रतिशत भाजपा या आधार वरती हजारो लोकांचे प्रवेश करून घेतले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page