डिजीटल दबाव वृत्त
काय आहे ट्विट चला तर पाहूया….
दरम्यान याबाबत ट्वीट करत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा.. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे, अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत. पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महातम्याची माहिती जाहीर करावी!… गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य… असे राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणत आहे.
शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा’ असे म्हणत राऊत यांनी शिंदे यांचा फोटो शेअर केला आहे.
गुंडाच्या हाती शिंदेंचा भगवा :- विनायक राउत
- पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो सुरवातीला संजय राऊत यांनी शेअर केला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तोच फोटो राऊतांनी ट्वीट केला होता.
- दुसऱ्या दिवशी पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केला. निलेश घायवळ पुण्यात गॅंगस्टर म्हणून ओळखा जातो. त्याच्यावर पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे या सारखे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
- तिसऱ्या दिवशी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम यांचा फोटो राऊत यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. मागीलवर्षी पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूकीवेळी जितेंद्र जंगमने शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हाचा हा फोटो आहे. जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे सात गंभीर गुन्हे नोंद असून 2021 मधे त्याच्यावर त्याच्या टोळीसह मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आज चौथ्या दिवशी देखील राऊत यांनी शिंदे यांचा गुंडासोबतचा फोटो शेअर केला आहे.