
ठाणे: कोकणी माणूस हा शिवसेनेचा मतदार आहे.कोकण हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने त्याच रागापोटी भाजप सरकार मुंबई गोवा हायवेचे काम पूर्ण करत नसून मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेस भाजप जबाबदार असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केला आहे.
शिवसेनेची वोट बँक तोडण्यासाठी मुंबई गोवा हायवेचे काम रखडवले जात आहे.भाजप आणि मिंधे सरकार हे जाणून बुजून करत आहे कारण कोकणी माणूस सेनेचा पाठीराखा आहे अशा आशयाचे ट्विट संजय घाडीगांवकर यांनी करून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे.भाजपचा कोकणी माणसावर राग असून या रागातून कोकणचा विकास जाणीवपूर्वक केला जात नाही असा आरोप घाडीगांवकर यांनी केला आहे.
जाहिरात

जाहिरात
