उपाध्यक्षपदी मिलिंद चव्हाण व संतोष पोटफोडे, सहसचिवपदी मिथून लिंगायत तर खजिनदारपदी सुरेश करंडे यांची निवड.
जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०७, २०२३.
देवरूख | निलेश जाधव.
संगमेश्वर तालुका प्रेस क्लब या संघटनेची नुतन कार्यकारिणी काल सोमवारी जाहीर झाली असून प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सचिन मोहिते तर सचिवपदी निलेश जाधव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी मिलिंद चव्हाण व संतोष पोटफोडे, सहसचिवपदी मिथून लिंगायत तर खजिनदारपदी सुरेश करंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुका प्रेस क्लबची बैठक देवरूख येथील हॉटेल पवार येथे सोमवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीत पत्रकारिता अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या संतोष पोटफोडे, पर्णिका सावंत व रेवा कदम यांचे प्रेस क्लबतर्फे अभिनंदन करण्यात आले. यानंतर प्रेस क्लबची नुतन कार्यकारिणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली. यामध्ये सदस्यपदी दिपक भोसले, शंकर वैद्य, मकरंद सुर्वे, रमेश शिंदे, नितीन हेगशेट्ये, रेवती पंडीत, पर्णिका सावंत यांची तर सल्लागार म्हणून युयुत्सू आर्ते, अमृतराव जाधव व प्रमोद हर्डीकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सागर मुळ्ये, अमित पंडीत आदिंसह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष प्रमोद हर्डीकर यांनी नुतन अध्यक्ष सचिन मोहिते व सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नुतन अध्यक्ष सचिन मोहिते यांनी बोलताना म्हटले कि, आपण सर्वांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तसेच प्रेस क्लबला नावारूपाला आणण्यासाठी आपण कटीबध्द असून प्रेस क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर सल्लागार युयुत्सू आर्ते यांनी बोलताना संगमेश्वर तालुका प्रेस क्लबला एका उंचीवर नेवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे सांगून नुतन पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.