संगमेश्वर तालुक्याने अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धेमध्ये १२ सुवर्णपदक ४ रौप्य पदक ३ कांस्य पदक पटकावली…

Spread the love

देवरूख- रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशनच्या मान्यतेने व तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ राजापूर तालुक्याच्या सहकार्याने १७ वी क्युरोगी व ११ वी पुमसे तायक्वांडो सन २०२४ स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल राजापूर या ठिकाणी ५ ते ७ जुलै दरम्यान संपन्न झाली.

या स्पर्धेमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी,लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, तालुक्यांमधून सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा जिल्हा संघटना अध्यक्ष व राज्य संघटना सदस्य श्री व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, जिल्हा सचिव लक्ष्मण के, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, राजापूर तालुक्याचे क्लब अध्यक्ष अभिजीत तेली, प्रमुख प्रशिक्षक मुकेश नाचरे, पंच प्रमुख भरत कररा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली

या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब,लायन्स तायक्वांडो क्लब, या सर्व क्लबचे खेळाडू संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये संगमेश्वर तालुक्याच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. क्यूरोगी व स्पर्धेम पुमसे स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून खेळाडूंनी मेडल प्राप्त केले. क्युरोगी प्रकारामध्ये पुढील खेळाडूंनी पदक पटकावले स्पेशल मुले 1- शौर्य माळी सुवर्ण पदक 2.अबीर शेट्ये सुवर्ण पदक ३. ऋतिक कांगणे कांस्य स्पेशल मुली 1.लक्ष्मी मोघे सुवर्ण पदक, सब ज्युनिअर मुली 1.पूर्वा वनकर रौप्य पदक २. सोनल शिंदे रौप्य पदक 3.यज्ञा गजबार रौप्य पदक 4.दुर्गा मोघे,कांस्य पदक,नक्षत्रा शिंदे, ध्रुवा शिंदे, श्रेया फाटक सहभाग

सब ज्युनिअर मुले. १ प्रथमेश कारेकर सुवर्ण पदक, सोमांश सावंत, वेदांत मसुरकर,शौर्य माळी सहभाग
ज्युनिअर मुले 1.गंधर्व शेट्ये सुवर्ण पदक 2.ओम घाग सुवर्ण पदक ३. तनिष खांबे सुवर्ण पदक ४. प्रणित कांबळे रौप्य पदक ज्युनिअर मुली 1. तनुश्री नारकर सुवर्ण पदक सिनियर मुले ,१.सुमीत पवार सुवर्ण पदक, २.साहिल घडशी सुवर्ण

पुमसे स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे

सब ज्युनियर फ्री-स्टाइल
सोमांश सावंत सहभाग

कॅडेट मुले

1.साहिल जागुष्टे-सुवर्ण पदक कॅडेट फ्री-स्टाइल मुले

1.साहिल जागुष्टे-सुवर्ण पदक

तसेच स्पेशल गटामध्ये शौर्य माळी यास बेस्ट फायटर व साहिल घडशी यास सीनिअर गटामध्ये बेस्ट फायटर नी सन्मानित केले. या यशस्वी तायक्वांडो पट्टूंना तालुका प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने,क्लब प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर,साईप्रसाद शिंदे, गायत्री शिंदे,सुमीत पवार आदींचे मार्गदर्शन लाभले. या सर्व पदक पटकाविलेल्या खेळाडूंचे तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाषजी बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने,नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड,देवरूखचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, देवरूख शहराच्या माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कररा, देवरूख शहराचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये,संगमेश्वर तालुक्याचे प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी,उपाध्यक्षा सौ.अँड.पुनम चव्हाण,उपाध्यक्ष संदेश जागुष्टे,जिल्हा प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण कर्रा, तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, सिनियर खेळाडू सौरभ वनकर, निखिल लाड, पंकज मेस्त्री, सिद्धी केदारी, क्लब सदस्या रुपाली कदम, अनुजा नार्वेकर, स्वाती नारकर, अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page