संगमेश्वर – देवरूख घाटात दरड कोसळल्याने रस्ता खचण्याची भीती

Spread the love

संगमेश्वर :- संगमेश्वर – देवरूख- साखरपा या राज्य मार्गावरील करंबेळे घाटात दरड कोसळल्याने रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे . या ठिकाणी तत्काळ लक्ष न दिल्यास रस्ता खचून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे .
या ठिकाणी सद्य : स्थितीत साईडपट्टीजवळील संरक्षक गार्ड कोसळले असून , त्यांचीही दुरवस्था झाली आहे . या ठिकाणी गार्ड नसेल तर येथे एखादे वाहन दरीत कोसळून अपघाताला निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे . दोन वर्षांपूर्वी संगमेश्वर ते साखरपा या ३२ किलोमीटर राज्य मार्गाचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले होते . मात्र , करंबेळे घाटामध्ये एका बाजूची दरड खचल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे . त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page