जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | सप्टेंबर १०, २०२३.
संंगमेश्वर तालुक्यातील मेघी सोलकरवाडीतील सुपुत्र व उगवता तारा संदेश भुवड याला गायन कलेची खूप आवड होती. परंतू त्याला मार्ग मिळत नव्हता.
युट्युबच्या माध्यमातून त्याला खूपच गायनाची आवड निर्माण झाली. पण पुढे घेऊन जाणारा रस्ता दाखवणारा गुरु मिळत नव्हता. त्यासाठी गुरुचे मार्गदर्शन मोलाचे असावे लागते. अशा वेळी फेसबुकच्या माध्यमातून देवरुख माळवाशी गावचे सुपुत्र कोकण कलारत्न भूषण पुरस्कृत कवी शाहीर संदीप सावंत यांच्याशी ओळख झाली. आणि काही दिवसांनी भेट झाली. त्या भेटीतून संदेश भुवड यांनी संदीप सावंत बुवांची कलेविषयी चर्चा झाली असता संदेश भुवडला स्टुडिओमध्ये गाणं गाण्याची खूप इच्छा होती. तर संदीप सावंत बुवांनी चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करुन एक गाणं गायला संधी दिली. आणि त्या संधीचं संदेश भुवडने सोनं केले. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सिंहाचा वाटा असणारी त्यांची धर्मपत्नी सौ. वैशाली भुवड आणि जन्मदाते आई वडील, भाऊ, बहीण देखील प्रोत्साहन करत होती.
त्याचप्रमाणे कोकण कलाप्रेमी दिनेश कुडतडकर आणि मित्र परिवार गोपाळ करंडे, विजय भोज, निलेश झेपले, सौ. माधवी झेपले, समीर तटकरे, पप्या बांडागळे, रोशन आग्रे, अक्षय भुवड, सुरज कुळये, प्रदिप मिरजोळकर, संदीप हसम, हरिदास सुरडकर, प्रशांत चोरगे यांचे देखील संदेशला मोलाचे सहकार्य लाभले आहे. गायक संदेश भुवड याने यावर्षी गणपतीच्या आगमनाचे गीत सुरेल आवाजात गाऊन लोकांची मने जिंकली आहेत. त्याच्यावर संगमेश्वर तालुक्यातील मित्र मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मेघी गावातील लहान थोर मंडळींचा तसेच सोलकर वाडीतील मित्र मंडळींचा गावकरी बंधु मनापासून प्रेमपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक कार्यकर्ते व मेघी गावचे माजी सरपंच प्रमिल चव्हाण यांनीसुद्धा संदेशला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मेघी गाव आणि रत्नभूनी ग्राम विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून संदेशवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संदेश भुवड आपल्या ग्रामदेवतेचे गीत स्टुडिओमध्ये गाण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. या चमकत्या हिऱ्याला खूप खूप शुभेच्छा.